सेन्सेक्स-निफ्टीत सलग घसरण

रोखे खरेदीच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे फेडच्या संकेताचे नकारात्मक परिणाम दिसून आले.

मुंबई : जागतिक स्तरावर प्रमुख भांडवली बाजारातील घबराटयुक्त नरमाईचे प्रतिबिंब गुरुवारी स्थानिक बाजारातही उमटले. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात आपटले.

फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या मागील बैठकीचे इतिवृत्तान्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही मिनिटांत जगातील प्रमुख भांडवली बाजारात घबराटीने घसरण दिसून आली. रोखे खरेदीच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे फेडच्या संकेताचे नकारात्मक परिणाम दिसून आले. परिणामी गुरुवारी प्रारंभिक व्यवहारात ५०,०००ला स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्सच्या वाढीला पाचर बसली. बँका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ऊर्जा समभागांमध्ये विक्री सुरू झाली आणि दिवसअखेरीला सेन्सेक्स ३३७.७८ अंशांच्या तोट्यासह ४९,५६४.८६ या पातळीपर्यंत खाली येऊन स्थिरावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex nifty continues to fall akp

ताज्या बातम्या