scorecardresearch

महिनाअखेर पडझडीने!

‘चीनमध्ये उत्पादनामध्ये घट झाल्याचे आकडे गुरुवारी पुढे आले.

महिनाअखेर पडझडीने!

तीन दिवसांत ‘सेन्सेक्स’ने गमावले ९५१ अंश

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक या आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये २८७ अंशांची पडझड झाली. सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवातीनंतर मात्र गुंतवणूकदारांनी नफा पदरी बांधून घेण्यासाठी विक्री सुरू केल्याने सत्राच्या उत्तरार्धात निर्देशांकात घसरण होत गेली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८६.९१ अंशांच्या घसरणीसह ५९,१२६.३६ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३.१५ अंशांच्या घसरणीसह दिवसअखेर १७,६१८.१५ पातळीवर स्थिरावला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने सुमारे ९५१ अंश गमावले आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, वायदे (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) करारांची मासिक मालिकेची समाप्ती असल्याने दिवसभराच्या सत्रादरम्यान बाजारात अस्थिर वातावरण होते.

‘चीनमध्ये उत्पादनामध्ये घट झाल्याचे आकडे गुरुवारी पुढे आले. परिणामी आशियाई बाजारातील नरमाईच्या सावटातच बाजाराची सुरुवात झाली. मात्र दुपारच्या सत्रात ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी सुरू झाल्याने निर्देशांक काही काळ सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते,’ असे आनंद राठी सिक्युरिटीजचे समभाग संशोधनप्रमुख नरेंद्र सोलंकी म्हणाले.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिडच्या समभागामध्ये तीन टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex nifty index share market akp 94

ताज्या बातम्या