सलग निर्देशांक घसरणीचा पाचवा फेरा

प्रमुख भांडवली बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशी कायम राहताना मुंबई निर्देशांक मंगळवारी गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात विसावला

प्रमुख भांडवली बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशी कायम राहताना मुंबई निर्देशांक मंगळवारी गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात विसावला. कमकुवत आशियाई बाजाराच्या जोरावर येथेही नफेखोरी होत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला ९४.०६ अंश घसरणीसह २०,६१२.१४ वर आणून ठेवले.
मुंबई शेअर बाजार यापूर्वी १७ डिसेंबर रोजी या किमान पातळीवर होता. बाजारात मंगळवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांसह पोलादनिर्मिती क्षेत्रातील समभागांचे मूल्य रोडावले. ८ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत होते. दुपारपूर्वी काहीसा सावरलेला शेअर बाजार व्यवहाराच्या शेवटच्या अध्र्या तासात पुन्हा तेजीने घसरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex off highs nifty below 6200 top seven stocks in focus

ताज्या बातम्या