scorecardresearch

सेन्सेक्सची उसळी, ५० हजारांपार; निफ्टी १५,११८ वर

बँक निफ्टी २ टक्के तर निफ्टी मेटल २.3 टक्क्यांवर

सेन्सेक्सची उसळी, ५० हजारांपार; निफ्टी १५,११८ वर

आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६१० वरून ५०,१९१.४३ वर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९५.४५ अंश वाढीने १५,११८ पर्यंत स्थिरावला. देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना भांडवली बाजारात उसळी पाहायला मिळत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एल अॅन्ड टी, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, सन फार्मा, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट या सर्व कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांकडून खरेदी मागणी राहिली आहे. बँक निफ्टी २ टक्के तर निफ्टी मेटल २.3 टक्क्यांनी वधारला आहे. इंडिया व्हीएक्स पुन्हा घसरला आहे.

सोमवारी ८४८.१८ अंश वाढीसह बंद झाला सेन्सेक्स

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४८.१८ अंश वाढीसह ४९,५८०.७३ वर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४५.३५ अंश वाढीने १४,९२३.१५ पर्यंत स्थिरावला होता. ३० मार्चनंतर प्रमुख निर्देशांकांनी प्रथमच सत्रातील सर्वाधिक अंशझेप नोंदविली होती.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-05-2021 at 10:30 IST

संबंधित बातम्या