scorecardresearch

सेन्सेक्सची ७०८ अंशांनी गाळण ; सावधतेने विक्रीला जोर

दिवसअखेर सेन्सेक्स ७०९.५४ अंशांच्या म्हणजेच १.३५ टक्क्यांच्या घसरणीसह ५१,८२२.५३ पातळीवर बंद झाला.

stock market
दिवसअखेर सेन्सेक्स ७०९.५४ अंशांच्या म्हणजेच १.३५ टक्क्यांच्या घसरणीसह ५१,८२२.५३ पातळीवर बंद झाला.

मुंबई : सलग दोन सत्रांतील तेजीनंतर भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा पुन्हा सावधतेकडे होरा वळला आणि बुधवारी त्यांनी नफावसुलीसाठी विक्रीला प्राधान्य दिले. जागतिक पातळीवरही समभाग विक्रीचा मारा झाल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्सच्या समभागात सर्वाधिक पडझड झाली.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा सक्रियपणे समभाग विक्री करत असल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा नांगी टाकत ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठल्याचाही बाजार मानसिकतेवर नकारात्मक परिणाम दिसून आला. 

दिवसअखेर सेन्सेक्स ७०९.५४ अंशांच्या म्हणजेच १.३५ टक्क्यांच्या घसरणीसह ५१,८२२.५३ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये २२५.५० अंशांची (१.४४ टक्के) घसरण झाली आणि तो १५,४१३.३० पातळीवर स्थिरावला.

गेल्या दोन सत्रांत भांडवली बाजारात तेजीचे वारे शिरले होते. मात्र अर्थ-अस्थिरतेच्या वातावरणात बाजारातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता नाही. शिवाय तेजी टिकून राहण्यासाठी कोणते ठोस कारणही नाही. खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर घसरणीनंतर पुन्हा चढू लागले आहेत. यामुळे बाजारात खरेदीला चालना मिळेल असे कोणतेही सकारात्मक कारण सध्या निदर्शनास येत नाही. याचबरोबर जागतिक पातळीवर स्थानिक चलनाच्या तुलनेत रुपया मजबूत होत असून अमेरिकेतील व्याजदर वाढीमुळे रोख्यांवरील परतावा दर वाढल्याने परदेशी गुंतवणूकदर सध्या तरी त्यांच्या समभाग विक्री धोरणात बदल करण्याची शक्यता नाही, असे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही के विजयकुमार यांनी मांडले. सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलच्या समभागात सर्वाधिक ५.२४ टक्क्यांनी घसरण झाली. त्यापाठोपाठ विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, बजाज फिनसव्‍‌र्ह, टायटन आणि बजाज फायनान्सचे समभाग पिछाडीवर होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex plunges 8 point nifty ends around 15400 zws

ताज्या बातम्या