sensex plunges 953 points nifty tumble nearly 2 percent zws 70 | Loksatta

गुंतवणूकदारांचे नुकसान  १३.३० लाख कोटींवर ; सलग चौथ्या सत्रात बाजारात धूळधाण

चार दिवसांच्या पडझडीत समभाग गुंतवणूकदारांना १३.३० लाख कोटींचा फटका सोसावा लागला आहे.

गुंतवणूकदारांचे नुकसान  १३.३० लाख कोटींवर ; सलग चौथ्या सत्रात बाजारात धूळधाण
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई: जागतिक भांडवली बाजारातील मंदीच्या प्रवाहाने स्थानिक बाजाराची धूळधाण केल्याचे सोमवारी दिसून आले. गेल्या आठवडय़ात प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून झालेली व्याजदरातील वाढ आणि त्याच्या प्रभावाने जागतिक मंदीच्या गडद झालेल्या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या मनांत भीतीने घर केल्याचे सोमवारच्या सलग चौथ्या सत्रातील मोठय़ा घसरणीने प्रत्यय दिला. चार दिवसांच्या पडझडीत समभाग गुंतवणूकदारांना १३.३० लाख कोटींचा फटका सोसावा लागला आहे.

परकीय गुंतवणूकदारांची माघार आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या ऐतिहासिक नीचांकी घसरणीने भांडवली बाजारातील निराशेची छाया आणखी गहिरी बनवली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या अपवाद केल्यास, सर्वव्यापी समभाग विक्रीच्या लाटांच्या परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९५३.७० अंशांनी गडगडून, ५७,१४५.२२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीला जेमतेम १७ हजारांची पातळी राखता आली. दिवसअखेरीस हा निर्देशांक ३११.०५ अंशांनी घसरून १७,०१६.३० या पातळीवर बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.६४ टक्के आणि १.८० टक्क्यांची घसरण झाली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकातील घसरण तर यापेक्षा किती तरी मोठी म्हणजेच अनुक्रमे २.८४ टक्के व ३.३३ टक्क्यांची होती. सोमवारच्या बाजारातील व्यवहारांवर मंदीवाले अर्थात विक्री करणाऱ्यांचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट होते.

आशियात इतरत्र, सोल (कोरिया), टोक्यो (जपान), तर चीनमधील शांघाय आणि हाँगकाँगमधील भांडवली बाजार मोठय़ा पडझडीसह बंद झाले. मध्यान्हीनंतर खुले झालेल्या युरोपातील भांडवली बाजार घसरणीतच व्यवहार करत होते, तर सरलेल्या सप्ताहअखेर अर्थात शुक्रवारी अमेरिकी बाजार नकारात्मक राहिले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय खनिज तेल किमतींचा मानदंड असलेले ब्रेंट क्रूड ०.७५ टक्क्यांनी घसरून िपपामागे ८५.५० डॉलरच्या पातळीवर सोमवारी व्यवहार करीत होते.

सेन्सेक्सचार सत्रांत २,५७५ अंश लयाला

गत चार सत्रांत सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकात चार टक्क्यांहून मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स २,५७४.५२ अंशांनी अर्थात ४.३१ टक्क्यांनी घसरला आहे.  तर मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल चार सत्रांत १३,३०,७५३.४२ कोटी रुपयांनी घसरून, २,७०,११,४६०.११ कोटी रुपयांवर उतरले आहे. जागतिक अनिश्चितता स्थानिक बाजारातील गुंतवणूकदारांच्या मन:स्थितीवर वर्चस्व गाजवत आहेत.

कितीही किमत मोजावी लागली तरी महागाईला काबूत आणण्याच्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक – ‘फेड’च्या भूमिकेने दिलेले हे हादरे आहेत. व्याजदरात वाढीतून, जगभरातील रोकडसुलभता शोषून घेण्यासह, डॉलरची किंमत उत्तरोत्तर वाढत चालली आहे. ज्यातून सबंध जागतिक बाजारात अशांतता निर्माण केली गेली आहे.  

विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस

जरी रिझव्‍‌र्ह बँकेले परकीय भांडवलाच्या माघारीला पायबंद घालण्यासाठी व्याजदर वाढविणे अपरिहार्य असले आणि रुपयाच्या रक्षणार्थ २० टक्के गंगाजळीचा तिने वापर केला असला तरी, सध्याच्या गढूळलेल्या वातावरणात भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी सध्या पडझडीचा धसका घेण्याचे कारण नाही.   

आलोक जैन, संस्थापक, स्मॉलकेस

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विकासदराच्या ७.३ टक्के अंदाजावर ‘एस अँड पी’ ठाम

संबंधित बातम्या

Gold-Silver Price Today: ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या
Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरातील घट कायम; जाणून घ्या आजचा महाराष्ट्रातील भाव
‘सेन्सेक्स’ला चार शतकी झळ; घसरणीने निर्देशांक ६१ हजारांखाली
ऑक्टोबरमध्ये ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; ‘एसआयपी’च्या माध्यमातून योगदान मात्र १३,००० कोटींच्या विक्रमी पातळीवर
‘जागतिक बँके’कडून विकास दर अंदाजात वाढ; ४० आधारबिंदूची भर घालत ६.९ टक्क्य़ांवर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द