सेन्सेक्स, निफ्टी विक्रमापासून दूर

सरकारच्या नव्या अर्थसाहाय्याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांची नफावसुली

सरकारच्या नव्या अर्थसाहाय्याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांची नफावसुली

मुंबई : विक्रमी टप्प्यावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच नफेखोरीचे धोरण अवलंबिले. सरकारच्या नव्या आर्थिक साहाय्याची दखल घेण्याऐवजी गुंतवणूदारांच्या नफावसुलीचा परिणाम प्रमुख निर्देशांकांवर अधिक जाणवला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८९.४५ अंश घसरणीसह ५२,७३५.५९ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.६५ अंश घसरणीने १५,८१४.७० पर्यंत खाली आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सत्रात त्यांच्या विक्रमी टप्प्याला स्पर्श केला होता.

नव्या आठवडय़ातील पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासून भांडवली बाजारात तेजीचे व्यवहार सुरू होते. असे करताना सेन्सेक्स सत्रात ५३,१२६.७३ पर्यंत झेपावला. तर निफ्टी व्यवहारात १५,९१५.६५ वर होता.

मुंबई निर्देशांकांने व्यवहारात ५३ हजाराला पुन्हा एकदा गाठले होते. तर निफ्टी या दरम्यान १६ हजाराच्या उंबरठय़ावर होता. भांडवली बाजारात वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या निर्देशांकांसह अधिक समभाग मूल्याचा मोह गुंतवणूकदारांना आवरता आला नाही.

भांडवली बाजार व्यवहार दरम्यानच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक उपाययोजनांचे स्पष्टीकरण आले. मात्र त्याची फारशी दखल गुंतवणूकदारांनी घेतली नाही. उलट प्रमुख निर्देशांकांची सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत नकारात्मक झाली.

सेन्सेक्समध्ये टायटन कंपनी, टीसीएस, एचसीएल टेक, बजाज फिनसव्‍‌र्ह, रिलायन्स इंडस्ट्रिीज, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आदी अधिक फरकाने घसरले. तर डॉ. रेड्डीज्, टाटा स्टील, टेक महिंद्र, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर काही प्रमाणात घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी जवळपास एक टक्क्य़ापर्यंत घसरले. तर पोलाद, आरोग्यनिगा निर्देशांक किरकोळ वाढले. मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास अर्ध्या टक्क्य़ाने वाढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex slips 189 points nifty holds 15800 zws

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या