निर्देशांकात सलग चौथी घसरण

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभागाने ३.२८ टक्क्य़ांची सर्वाधिक घसरण राखली.

मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि पेटीएमची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभागाने भांडवली बाजारात पदार्पणाच्या दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केल्याने गुरुवारी सलग चौथ्या सत्रात विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७२.३२ अंशांच्या घसरणीसह ५९,६३६.०१ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३३.८५ अंशांची घसरण झाली. तो १७,७६४.८० पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभागाने ३.२८ टक्क्य़ांची सर्वाधिक घसरण राखली. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे स्टेट बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग प्रत्येकी १.१६ टक्क्य़ांनी वधारला. पेटीएमच्या समभागाची निराशाजनक सूचिबद्धता आणि वाढत्या महागाईमुळे जागतिक बाजारपेठांवर दबाव निर्माण झाल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. धातू आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे बाजारात घसरण कायम आहे. सणोत्सवात दुचाकी वाहनांची कमी झालेली विक्री आणि सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ामध्ये कमतरता निर्माण झाल्याने वाहन निर्मिती क्षेत्रावरही दबाव दिसून आला, असे जियोजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex slumps 372 points nifty drops below 17800 zws

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या