नवी दिल्ली : टाटा समूहातील धातू कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये महाविलीनीकरणाच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. प्रस्तावानुसार, समूहातील सात धातू व्यवसायातील उपकंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा समूहातील टाटा मेटॅलिक्स, टाटा टिनप्लेट, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टीआरएफ लिमिटेड या भांडवली बाजारात सूचिबद्ध चार कंपन्यांचा विलीनीकरणात समावेश आहे. इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायिनग लिमिटेड आणि एस अँड टी मायिनग कंपनी या तीन सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे देखील विलीनीकरण करण्यात येईल. या सर्व कंपन्या टाटा स्टीलच्या साहाय्यक कंपन्या असून टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेडमध्ये ७४.९१ टक्के, टिनप्लेट ७४.९६ टक्के, टाटा मेटॅलिक्स ६०.०३ टक्के, इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेडमध्ये ९५.०१ टक्के आणि टीआरएफ लिमिटेडमध्ये तिची ३४.११ टक्के हिस्सेदारी आहे. तर टाटा स्टील मायिनग लिमिटेड आणि एस अँड टी मायिनग कंपनी लिमिटेड या टाटा स्टीलच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या आहेत. विलीनीकरण होत असलेल्या सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांनी देखील प्रस्तावावर सकारात्मक विचार करत विलीनीकरणास एकमताने मान्यता दिली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven tata group metal companies to merge with tata steel zws
First published on: 24-09-2022 at 05:23 IST