सप्टेंबरमध्ये बाजारात १७,८२२ कोटींची विदेशी गुंतवणूक

मुंबई : भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक दररोज नवनवीन ऐतिहासिक शिखर गाठत आहेत. उच्च परताव्यामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूक (एफपीआय) भारतीय बाजाराकडे आकर्षित होत असून, विद्यमान सप्टेंबर महिन्यात तिने आतापर्यंत १७,८२२ कोटी रुपयांचे प्रमाण गाठले आहे.

bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
fraud of 44 lakh with investors in Dombivli by giving lure of increased interest
वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १ ते १७ सप्टेंबर दरम्यान समभाग आणि संलग्न गुंतवणूक साधनांमध्ये ११,२८७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर रोखे बाजारात ५,०१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

विदेशी गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये ११,३०८ कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली होती आणि नंतरच्या ऑगस्ट महिन्यात २,०८३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एकूणच परदेशी गुंतवणूकदारांकडून २०२१ मध्ये आतापर्यंत ६२,४०६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

‘जुलैपासून भांडवली बाजाराकडे विदेशी गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणुकीच्या साधनांमध्ये १२,३०८ कोटी रुपयांची विक्री केली, मात्र ऑगस्टमध्ये हा कल बदलल्याचे आढळून आले. ऑगस्टमध्ये २,०८३ कोटी रुपयांची समभाग खरेदी आणि सप्टेंबरपर्यंत पहिल्या १७ दिवसांत ११,२८७ कोटी रुपयांची गुंतवणूक हे दाखवून देते. रुपया डॉलरच्या तुलनेत स्थिर असल्याने परदेशी गुंतवणूकदारांकडून चालू वर्षात जुलैमध्ये पहिल्यांदा रोखे बाजारात गुंतवणूक करण्यात आली,’ असे जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

चीनमधील भांडवली बाजारातील चीनच्या नियामक मंडळाचे घटते नियंत्रण आणि त्याचबरोबर तेथील बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय भांडवली बाजार गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनत आहे.