रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी विक्री होत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे.बीएसई सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी १७००० पर्यंत खाली आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी देखील ४८० हून अधिक अंकांनी घसरला आहे. दोन दिवसांत सेन्सेक्स २,४४८ अंकांनी घसरला आहे. या घसरणीदरम्यान टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

जागतिक स्तरावरील परिस्थितीचा वाईट परिणाम सोमवारी भारतीय बाजारपेठेवर पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी, बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स-निफ्टीमध्ये या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी इंट्राडे घसरण पाहायला मिळाली. या वर्षी प्रथमच निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी घसरला आहे. सोमवारी बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. तर बँकिंग, रियल्टी, ऑटो, मेटल समभागांची जोरदार विक्री पाहायला मिळत होती. दुसरीकडे फार्मा, एफएमसीजी, ऑइल-गॅसच्या समभागांमध्ये घसरण झाली.

ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स १७४७.०८ अंकांनी म्हणजेच ३ टक्क्यांनी घसरून ५६,४०५.८४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ५३१.९५ अंकांनी म्हणजेच ३.०६ टक्क्यांनी घसरून १६४८२.२० च्या पातळीवर बंद झाला.

दुपारी २.४५ वाजता सेन्सेक्स १५९६ अंकांनी घसरून ५६,५५६.५८ वर ट्रेड करत होता. निफ्टी देखील ४८५.२० अंकांनी घसरून १६,८८९.५५ वर ट्रेड करत होता. टीसीएस चे समभाग बीएसईवर १.१७ टक्क्यांच्या वाढीसह ३७३८.९० अंकांवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्सचे समभाग १.५ टक्‍क्‍यांनी आणि आयटीसीचे समभाग १.८५ टक्‍क्‍यांनी घसरले.