मुंबई : आशिया आणि युरोपीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवल्याने बाजारात तेजीचे वारे कायम आहेत. परिणामी, मंगळवारी सलग चौथ्या सत्रात तेजीची दौड कायम राखत ‘सेन्सेक्स’ने आणखी ३७५ अंशांची भर घालत ६१ हजारांपुढे मजल मारली.

दिवसअखेर सेन्सेक्स ३७४.७६ अंशांनी वधारून ६१,१२१.३५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ५४३.१४ अंशांची मजल मारत ६१,२८९.७३ अंशांच्या उच्चांकी पातळीला त्याने स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये १३३.२० अंशांची भर पडली आणि तो १८,१४५.४० पातळीवर स्थिरावला.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

जागतिक बाजारातील तेजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमधील उत्साहाच्या जोरावर देशांतर्गत बाजारात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा मिळविला आहे. शिवाय नवीन मागणी आणि उत्पादन विस्तार भारताच्या निर्मिती क्षेत्राची ऑक्टोबर महिन्यात उत्साहवर्धक कामगिरीने बाजारातील उत्साहात भर घातली. सध्या गुंतवणूकदारांचे बुधवारी होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण निर्णयाकडे लक्ष लागले आहे. मध्यवर्ती बँकेकडून आगामी काळात व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेतली जाण्याचा कयास वर्तविण्यात येत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

एफआयआय सक्रिय

परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गेल्या सहा सत्रांमध्ये देशांतर्गत भांडवली बाजारात १ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८,२०० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढीचा वेग कमी होण्याच्या आशेने परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे मोर्चा वळविला आहे.