आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घडामोडी, व्यापार युद्ध आणि कमकुवत झालेला रुपया याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स सकाळी जवळपास ३३० अंकांनी गडगडला असून निफ्टीतही सुमारे १०० अंकांची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सेन्सेक्सची दोन दिवसांत जवळपास एक हजार अंकांनी घसरगुंडी उडाली होती. सोमवारी देखील शेअर बाजारात असेच चित्र होते. सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ३३८.७२ अंकांनी घसरुन ३७, ७५१ वर पोहोचला. तर निफ्टीही १०० अंकांनी घसरुन ११, ४१५ वर पोहोचला. बँकेच्या शेअर्सचे भाव घसरले असून अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेचे भाव घसरले आहेत. याशिवाय टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्सच्या शेअर्सचे दरही घसरले आहेत.