मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडील (एफआयआय) समभागांचे मूल्य मार्च तिमाहीअखेर ६१२ अब्ज डॉलरवर घसरल्याचे ‘मॉर्निगस्टार’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने स्पष्ट केले. तिमाहीगणिक त्यात ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू वर्षांच्या सुरुवातीपासून भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा सुरू असून, त्यांच्या समभाग धारणेत तीव्र घसरण सुरू आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत (मार्च २०२१) या गुंतवणूकदारांनी धारण केलेल्या समभागांचे मूल्य ५५२ अब्ज डॉलर होते. सरलेल्या मार्च तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी १४.५९ अब्ज डॉलर मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर याच काळात त्यांच्याकडून झालेली समभाग खरेदी ही केवळ ५.१२ अब्ज डॉलरची आहे.

 शिवाय सरलेल्या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे देशांतर्गत भांडवली बाजारातील योगदान देखील मार्च तिमाहीत १८.३ टक्कय़ांवरून कमी होत १७.८ टक्कय़ांवर आले आहे.