जेव्हा एखादी आणीबाणीसदृश स्थिती निर्माण होते तेव्हा तो कालावधी कोणत्याही संघनायकासाठी सर्वात व्यस्त ठेवणारा कालावधी असतो. साहजिकच मीसुद्धा माझ्या संघातील सहकाऱ्याबरोबरच्या नेहमीपेक्षा अधिक संपर्कात असतो.

आम्ही मायक्रोसॉफ्ट चमू या साधनाचा वापर करतो. आमच्या ठराविक पूर्व नियोजित बैठका व्यतिरिक्त गरज असेल तेव्हा संघसदस्यांसाठी मी वैयक्तिकरित्या उपलब्ध राहीन आणि टाळेबंदीमुळे आमच्या संपर्कात कोणताही व्यत्यय येणार नाही याची तूर्त खात्री करत आहे.

संघ सदस्यांचे मनोबल सुदृढ राखण्याचे आव्हान संघ नायकासमोर असते तसे माझ्यासमोरसुद्धा आहे आणि आमच्या संघसहकाऱ्यांचे मनोबल कायम राखण्याचा माझा प्रयत्न असतो. सध्या घरूनच काम सुरू आहे. कामाची जागा सोडली तर सर्व काही दैनंदिन कामकाज कार्यालयामध्ये होते तसेच होत आहे. आमच्याकडे विभागांमधील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी बैठकांचे आयोजन केले आहे आणि या बैठका कार्यालयात होतात तशा होत आहेत.

या व्यतिरिक्त जवळजवळ दररोज मी कोणत्या ना कोणत्यातरी ‘वेबिनार’मध्ये सहभागी होत असतो त्यामुळे ज्ञान मिळते आणि माहिती अद्यावत करण्याचा माझा प्रयत्न असतो. आपत्कालीन परिस्थिती बरेच काही शिकवत असते. एरवी सामान्य परस्थितीत विचार करायला वेळ नसतो. सध्या पुरेसा वेळ उपलब्ध असल्याने आम्ही नियोजनाच्या पातळीवर खूप काम करीत आहोत.

व्यवसायात अखंडता राहील, असा मला विश्वास वाटतो. संघनायकाने आपल्या संघाचे नेतृत्व करणे आणि संघ सहकाऱ्यांना या परिस्थितून तग धरून राहण्यास मार्गदर्शन करणे किती महत्त्वाचे असते हा धडा मी घेतला आहे. माणूस परिस्थितीशी मोठय़ा प्रमाणात जुळवून घेत असतो. कधी काळी ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना मांडणाऱ्याला वेडात काढले असते. पण घरूनसुद्धा कंपनीचा गाडा सुनियोजानाच्या बळावर व्यवस्थेत हाकता येतो.