‘सेन्सेक्स’मध्ये किरकोळ वाढ

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६.१७ अंशांच्या वाढीसह ५३,१७७.४५ पातळीवर विसावला.

‘सेन्सेक्स’मध्ये किरकोळ वाढ
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि तेल-वायू, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभाग खरेदी करण्यास गुंतवणूकदारांनी उत्सुकता दर्शविल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातील नीचांकी पातळीपासून सावरत मंगळवारी सत्रसमाप्तीला सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६.१७ अंशांच्या वाढीसह ५३,१७७.४५ पातळीवर विसावला. जागतिक बाजारातील कमकुवत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विRीचा मारम्य़ामुळे सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात सोमवारच्या बंद पातळीच्या तुलनेत ३९० अंश गमावत ५२,७७१ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १५,८५०.२० पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी ३२ कंपन्यांचे समभाग वधारले होते.

भांडवली बाजाराची सकाळच्या सत्रात निराशाजनक सुरुवात झाल्यानंतर जागतिक पातळीवरील अनुकूलतेमुळे तेजीवाल्यांनी बाजाराला सकारात्मक पातळीवर टिकून राहण्यास मदत केली. मात्र खनिज तेलाच्या वाढत्या किमतीच्या चिंतेने आणि रोख्यांवरील परताव्याचा वाढत्या दरामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. दुसरीकडे चीनमधील करोना निर्बंध कमी होण्याच्या आशेने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण झाला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slight rise in sensex global positive signs ysh

Next Story
‘जिओ इन्फोकॉम’ची सूत्रे आकाश अंबानीकडे!; मुकेश अंबानी यांचा संचालकपदाचा राजीनामा 
फोटो गॅलरी