संक्षिप्त व्यापार-वृत्त : बॉक्सिंगचे हात शिवणयंत्रावर; ‘द हब बाय उषा’मध्ये प्रियांका चोप्रा

जीवनाधारित चित्रपट असलेल्या मेरी कोमशी संलग्न असलेली भागीदार कंपनी उषा इंटरनॅशनलने ‘द हब बाय उषा’ येथे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या उपस्थितीत चित्रपट आणि स्त्री सक्षमीकरणाच्या संलग्नतेचा समारंभ नुकताच आयोजित केला होता.

जीवनाधारित चित्रपट असलेल्या मेरी कोमशी संलग्न असलेली भागीदार कंपनी उषा इंटरनॅशनलने ‘द हब बाय उषा’ येथे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या उपस्थितीत चित्रपट आणि स्त्री सक्षमीकरणाच्या संलग्नतेचा समारंभ नुकताच आयोजित केला होता. ‘बॉक्सिंग चॅम्पियन’ मेरी कोम हिच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटासोबतच्या संलग्नेततून उषा इंटरनॅशनलकडून खेळ आणि कौशल्य विकास उपक्रमांतून स्त्रियांना सक्षम करणाऱ्या उपक्रमांना याद्वारे कंपनीने पाठिंबा दर्शविला आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांना उपजीविका मिळवून देण्याकरिता उषा कंपनीने सुरू केलेल्या ‘उषा शिलाई विद्यालया’मधील दोन स्त्री उद्योजकांचा प्रियांकाच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रियांकाला ‘उषा जेनोम ऑटोमेटिक’ शिवणयंत्राच्या साहाय्याने ‘एम्ब्रॉडरी’तून तयार करण्यात आलेले ‘फेस पोट्र्रेट’ भेट देण्यात आले. उषा इंटरनॅशनल लिमिटेडच्या संचालिका छाया श्रीराम या वेळी उपस्थित होत्या. ‘मेरी कोम’ या चित्रपटासोबत भागीदारी करणे हे आमच्या कौशल्य विकास आणि खेळ यांच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याच्या मूलभूत तत्त्वाला साजेसे असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांनाही पतमानांकन; स्मेरा रेटिंग्जचा उपक्रम
मुंबई : व्यवसायाची दशकपूर्ती साजरी करणाऱ्या ‘स्मेरा रेटिंग्ज लिमिटेड’ने सामाजिक संस्थांचे मूल्यमापन करणारी यंत्रणा सुरू केली आहे. याबाबतच्या उत्पादनाला सुरुवात करत असल्याची घोषणा स्मेरा रेटिंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकर चक्रवबोर्ती यांनी नुकतीच केली. ते म्हणाले की, सामाजिक संस्थांचा टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांचे सर्वसमावेशक परिक्षण या उत्पादनाच्या माध्यमातून केले जाते. या परिक्षणाचा मुख्य हेतू सामाजिक संस्तांची कार्यक्षमता सुधारणे आणि दाते तसेच भागधारक यांची निर्णयक्षमता वाढवणे हा आहे. संस्थाबाबतची मर्यादित उपलब्ध माहिती, विस्कळीत आणि विश्वासार्हता नसलेली माहिती यामुळे या क्षेत्राला पुरेसे श्रेय मिळत नाही. स्वतंत्र, अर्थपूर्ण आणि परिणामकारक परिक्षणामुळे सामाजिक संस्थांना अशा समस्यांवर मात करणे शक्य झाले आहे. याच कार्यक्रमामध्ये मानांकन कंपनीच्या दहाव्या वर्षांच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.  
अपना बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा दत्ताराम चाळके
मुंबई : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या अपना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा दत्ताराम चाळके यांची निवड झाली आहे. चाळके यांच्याकडे सलग तिसऱ्यांदा बँकेचे अध्यक्षपद आले आहे. बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या नेतृत्वाखालील अपना परिवार पॅनलने निर्विवाद विजय मिळविला होता. या निवडणुकीत पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मताधिक्य मिळविले. अपना बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा व सभासदांच्या विश्वासाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष चाळके यांनी दिली.
‘इनक्लिनिशन’तर्फे ऑक्टोबरमध्ये उद्योजकता उपक्रम
मुंबई : तांत्रिक प्रशिक्षण तसेच औषधनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘इनक्लिनिशन’ या संस्थेतर्फे उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१४ दरम्यान संस्थेच्या डोंबिवली येथील प्रशिक्षण केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत होईल. यामध्ये १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे ‘इनक्लिनिशन’चे संचालक अविनाश देवधर यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात विविध तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तर दुपारच्या सत्रात क्षेत्र अभ्यास, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध सादरीकरण तसेच प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या http://www.inclinition.com   या संकेतस्थळावर,  info@inclinition.com या इमेलवर अथवा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५१-२४००३९७ वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संचालक अमृत करमरकर यांनी केले आहे.
‘झायडस’ची ‘शुगर फ्री’ मोहिम शाळांमधून
मुंबई  : भारतामधील पहिल्या क्रमांकाचा शुगर-सबस्टिय़ुट नाममुद्रा असलेल्या शुगर फ्रीने ‘अक्षय पत्रा फाऊंडेशन’सोबत देशातील शालेय मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी दुपारचे जेवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘तुमच्या कॅलरी दान करा’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, शेफ संजीव कपूर यांसोबतच ‘झायडस कॅडिला’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी गणेश नायक आणि ‘झायडस वेलनेस लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक एलकाना ईझेकिएल यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले.  शुगर फ्री सबस्टिय़ुट प्रकारातील अग्रेसर असून तिचा ९३ टक्के बाजारहिस्सा आहे. चे उत्पादन आहे. आहे. शुगर फ्री उत्पादन असलेली ‘झायडस वेलनेस’ ही सहयोगी कंपनी ‘कॅडिला हेल्थकेयर’ या अहमदाबादस्थित अग्रेसर औषधनिर्माण कंपनीचाच भाग आहे.
महानगर बँकेकडून ‘महा रूपे डेबिट’ कार्ड
मुंबई : ५५ शाखा व ३९ एटीएम केंद्रांद्वारे संपूर्ण राज्यात पाच लाखांपेक्षा जास्त खातेदार असलेल्या महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेने ‘रूपे’ भरणा प्रणालीवर आधारित ‘महा रूपे डेबिट कार्ड’ आपल्या ग्राहकांसाठी प्रस्तुत केले. बँकेने या आधीच रूपे एटीएम कार्ड आपल्या खातेदारांना दिले असून, त्या जागी हे नवे कार्ड विनामोबदला बदलून दिले जाईल, असे बँकेचे अध्यक्ष गुलाबराव शेळके यांनी सांगितले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)चे संचालक पुष्पेंद्र सिंग आणि या सुविधेसाठी बँकेला तंत्रज्ञानात्मक पाठबळ पुरविणाऱ्या पिनॅकस या कंपनीचे संस्थापक गोविंदन या प्रसंगी उपस्थित होते. रूपे डेबिट कार्ड प्रस्तुत करणारी महानगर बँक ही देशातील ४६वी नागरी सहकारी बँक असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. ‘रूपे’चे सेवा जाळे स्वीकारणाऱ्या सहकारी बँकांची संख्या १७२ वर गेली असून, अलीकडे दर आठवडय़ाला चार-पाच नवीन बँकांकडून संलग्नता मिळविली जात असल्याची त्यांनी माहिती दिली. महानगर बँकेचा राज्याबाहेर कार्यक्षेत्र विस्तारण्याचा मानस असून ‘बहुराज्यीय दर्जा’साठी रिझव्‍‌र्ह बँकेला दिलेल्या अर्जावर पुढील दोन-तीन महिन्यांत निर्णय अपेक्षित असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. लवकरच आठ नवीन शाखा बँक सुरू करीत असून, इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन ट्रेडिंग आणि पुढे जाऊन मोबाइल बँकिंग अशा अत्याधुनिक सुविधाही बँकेच्या खातेदारांना देण्यासाठी सुसज्जता केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Small business news

ताज्या बातम्या