पीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने केएसके महानदी पॉवरचे वसुली थकलेले कर्ज खाते आदित्य बिर्ला मालमत्ता पुनर्रचना कंपनीकडे (एआरसी) शुक्रवारी हस्तांतरित केले. स्टेट बँकेने यातून थकीत कर्जाच्या तुलनेत जवळपास ५८ टक्क्यांची तूट सोसून १,६२२ कोटी रुपये मिळविले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल २०२२ च्या आकडेवारीनुसार, स्टेट बँकेचे केएसके महानदी पॉवरकडे ३,८१५.०४ कोटी रुपयांचे थकीत कर्ज होते. स्टेट बँकेने खुल्या विक्रीच्या माध्यमातून १,५४४.०८ कोटी रुपयांच्या राखीव किमतीवर १०० टक्के रोख आधारावर २० एप्रिल २०२२ रोजी ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली होती. स्टेट बँकेला यासाठी १५ इरादा पत्रे प्राप्त झाली होती. मात्र मेअखेरीस झालेल्या ई -लिलावात आदित्य बिर्ला एआरसीकडून १,५४४.०८ कोटी रुपयांची केवळ एकच बोली येऊ शकली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State bank overdue loan account transferred aditya birla arc public sector ysh
First published on: 20-08-2022 at 00:02 IST