गुंतवणूकदारांचे डोळे पतधोरणाकडे

रिझव्‍‌र्ह बँकेच्या उद्याच्या संभाव्य व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी भांडवली बाजारात फारसे व्यवहार केले नाहीत. परिणामी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार स्थिर राहिले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या उद्याच्या संभाव्य व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी भांडवली बाजारात फारसे व्यवहार केले नाहीत. परिणामी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार स्थिर राहिले. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ हे एक शतांश टक्क्यापेक्षाही कमी अंशाने अनुक्रमे नकारात्मक तर सकारात्कम स्थितीत नोंदले गेले. मुंबई निर्देशांक १० अंश घसरणीसह २०,१०३.३५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजार ०.१५ अंश वाढीसह ६,०७४.८० वर बंद झाला. घसरत्या विकास दराबरोबरच महागाईदेखील कमी होण्याची शक्यता वर्तविणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या सायंकाळी उशीरा जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजापूर्वीच भांडवली बाजाराचे व्यवहार सावध पातळीवर विसावले. त्यामुळे व्याजदराशी निगडित बँक, वाहन, बांधकाम क्षेत्रातील निर्देशांकही फार काही चढ-उतार नोंदवू शकले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market stables investor eye on rbi decision

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या