मुंबई : रशिया-युक्रेनमधील वाटाघाटी सकारात्मक दिशेने पुढे सरकत असल्याचा सुपरिणाम आणि माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा बुधवारी ५६,००० अंशांच्या पातळीवर परतला आहे. मंगळवारच्या सत्रातील घसरणीनंतर सेन्सेक्सने पुन्हा १००० अंशांची मुसंडी घेतली आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०३९.८० अंशांनी वधारून ५६,८१६.६५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३१२.३५ अंशांची वाढ झाली. तो १६,९७५.३५ पातळीवर स्थिरावला.

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

युद्धविरामाच्या आशेसह, परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेला समभाग विक्रीचा माराही ओसरत चालला आहे. दुसरीकडे खनिज तेलाच्या किमतीही तीव्र गतीने नरमल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात खरेदीला उत्सुक गुंतवणूकदारांना बळ मिळाले. सकारात्मक जागतिक संकेत आणि करोनाने पुन्हा डोके वर काढूनही सावरलेल्या चीनच्या भांडवली बाजाराचे अपेक्षित चांगले प्रतिबिंब बुधवारी भारतीय बाजारात उमटले. यातून अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीसाठी सुरू असलेल्या बैठकीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. ‘फेड’ने व्याजदरात पाव टक्के वाढ केली तरी ती सार्वत्रिक अपेक्षेपेक्षा कमीच राहणार असल्याने बाजाराला दिलासा देणारी ठरेल, असा एकंदर बाजारातील अस्थिरता कमी करणारा सूर आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी बुधवारच्या व्यवहारांविषयी मत व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग ५ टक्क्यांची तेजी दर्शवित होता. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसव्‍‌र्ह, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले.

रुपयात ४१ पैशांनी वाढ

भांडवली बाजारातील तेजीवाल्यांच्या सरशीचे अनुकरण करीत बुधवारी रुपया ४१ पैशांनी वाढून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर बंद झाला. बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. ७६.१९ चा उच्चांक गाठल्यानंतर  दिवसअखेर ४१ पैशांची वाढ नोंदवून रुपया ७६.२१ वर स्थिरावला.