रोषणाई आणि प्रकाश उत्पादनांतील आघाडीची कंपनी सूर्या रोशनी लिमिटेडने उन्हाळी मोसमात नवीन डिझायनर, सजावट असलेले पंखे दाखल केले आहेत. या नव्या उत्पादनांतून ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे तिचे लक्ष्य आहे.
सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक राजू बिस्ता यांनी सांगितले की, पंख्याच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून तीन ते चार वर्षांच्या कालावधीत कंपनीला ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य साध्य करायचे आहे. म्हणजे पंख्यांच्या ५,००० कोटी रुपयांच्या एकूण भारतीय बाजारपेठेच्या १० टक्के हिस्सा काबीज करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
सूर्याच्या पंख्यांच्या श्रेणीमध्ये सििलग, पोर्टेबल, िभतीवरील पंख्यांसह एक्झॉस्ट पंख्यांचा समावेश आहे. सूर्याने पशांचा मोबादला मिळवून देणारी उत्पादने भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहेत. देशात विजेचा दाब सतत बदलत असतो ही बाब ध्यानात घेऊन पंख्यांचे आरेखन करण्यात आले आहे. कंपनीच्या दोन लाख किरकोळ विक्रेत्यांचे जाळे पसरले आहे.