पहिल्या सहामाहीत भारतात राहत असताना स्वित्झर्लॅन्डचे पर्यटक सर्वाधिक खर्च करत असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी या कालावधीत ८,५९० रुपये खर्च केले. ही रक्कम गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये स्विस पर्यटकांनीच खर्च केलेल्या रकमेच्या १७ टक्के अधिक आहेत.
भारतातल्या आघाडीच्या खर्च करणाऱ्या विदेशी पर्यटकांची यादी हॉटेल बुकिंगमध्ये जगभरात अग्रणी असणाऱ्या ‘हॉटेल्स डॉट कॉम’ने आपल्या नव्या हॉटेल प्राइस इंडेक्स (एचपीआय)नुसार जाहीर केली आहे. जगभरात हॉटेलमध्ये खर्च होणाऱ्या आकडय़ाचा एक अहवाल म्हणून या निर्देशांकाकडे पाहिले जाते. अहवालातून असेही निदर्शनास आले आहे की, २५ देशांपकी १९ देशांमधल्या पर्यटकांनी भारतात गेल्या वर्षी जितके पसे हॉटेल खोल्यांवर खर्च केले त्यापेक्षा जास्त पसे त्यांनी २०१४ मध्ये हॉटेल खोल्यांवर खर्च केले. परिणामत: यंदा देशभरातल्या हॉटेल खोल्यांच्या दरांमध्ये सरासरी ४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षी भारतात सर्वाधिक खर्च करणारे पर्यटक म्हणून हाँगकाँगचे नागरिक प्रथम क्रमांकावर होते. यंदा त्यांनी एका हॉटेल खोलीसाठी प्रतिरात्र ७,९९५ रुपये खर्च करत स्विस नागरिकांपाठोपाठ द्वितीय स्थान मिळवले आहे. इटालियनांच्या खर्चात ३६ टक्के एवढी सर्वाधिक वाढ दिसली असून ते प्रति रात्रीसाठी सरासरी ७,५७१ रुपये खर्च करतात.