scorecardresearch

‘एअर एशिया’वर संपूर्ण मालकीची एअर इंडियाची योजना

एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची ८३.६७ टक्के हिस्सेदारी आहे.

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाने किफायती दरातील प्रवासी विमान सेवा ‘एअर एशिया इंडिया’वर १०० टक्के मालकी मिळविण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावित व्यवहारासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडून तिने मंजुरी मागितली आहे.

एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची ८३.६७ टक्के हिस्सेदारी आहे. तर एअर एशिया इंडियामधील उर्वरित हिस्सेदारी मलेशियास्थित एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकडे (एएआयएल) आहे. कोणत्याही कंपनीत एका ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक भागीदारीचा व्यवसाय असल्यास त्यासाठी, मक्तेदारी प्रतिबंधक ‘स्पर्धा आयोगा’ची मंजुरी आवश्यक ठरते.

गेल्या वर्षी टाटा समूहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडून एअर इंडिया आणि तिची साहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण करण्यात आले. याचबरोबर टाटा समूहाची ‘विस्तारा एअरलाइन्स’साठी सिंगापूर एअरलाइन्सबरोबर भागीदारी सुरू आहे. नव्याने प्रस्तावित कराराअंतर्गत टाटा सन्सच्या मालकीची कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या माध्यमातून ‘एअर एशिया इंडिया’चा १०० टक्के हिस्सा खरेदी केला जाणार आहे. या अनुषंगाने प्रस्तावित कराराचे मूल्यमापन करताना, स्पर्धा आयोगाकडून बाजारात निकोप स्पर्धा टिकून राहील याची खातरजमा केली जाईल.  एअर एशियाने जून २०१४ मध्ये विमान वाहतुकीस सुरुवात केली होती. कंपनी प्रवासी वाहतूक, हवाई माल वाहतूक आणि चार्टर उड्डाण सेवा पुरवते. मात्र कंपनीकडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुरविल्या जात नाहीत. टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एअर इंडिया’ विमान कंपनी खरेदीसाठी १८ हजार कोटींची यशस्वी बोली लावली होती

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata air india proposes to acquire airasia india zws

ताज्या बातम्या