scorecardresearch

हिसाशी ताकेउची यांच्याकडे मारुती सुझुकीची धुरा

देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनी मारुती-सुझुकीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा आता हिसाशी ताकेउची यांच्याकडे देण्यात येणार आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनी मारुती-सुझुकीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा आता हिसाशी ताकेउची यांच्याकडे देण्यात येणार आहे. ते केनिचि आयुकावा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. नवीन आर्थिक वर्षांत येत्या १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षे म्हणजे ३१ मार्च २०२५ पर्यंत हिसाशी ताकेउ ही जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती कंपनीने दिली.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ताकेउची यांच्याकडे पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुकावा ३१ मार्च २०२२ रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ताकेउची यांची नियुक्ती केली, असे मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र कंपनीच्या व्यवस्थापनातील संक्रमण सुलभ करण्यासाठी, आयुकावा ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण-वेळ संचालक म्हणून कार्यरत राहणार आहे.

ताकेउची १९८६ मध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (एसएमसी) मध्ये रुजू झाले होते. एसएमसीमधील आंतरराष्ट्रीय कामकाजाचा तसेच परदेशातील बाजारपेठेतील विस्तृत अनुभवासह, ते जुलै २०१९ पासून मारुती सुझुकीच्या संचालक मंडळावर कार्यरत असून एप्रिल२०२१ पासून सहव्यवस्थापकीय संचालक (व्यावसायिक) म्हणून नियुक्त आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The countrys leading automaker hisashi takeuchi owns maruti suzuki ysh