‘जिओ-बीपी’ नाममुद्रेअंतर्गत पहिला पेट्रोल पंप मुंबईनजीक

कंपनीकडून भारतातील १४०० हून अधिक पेट्रोल पंप आणि रिलायन्सच्या आधिपत्याखाली असलेल्या ३१ विमान इंधन (एटीएफ) भरणा केंद्रांच्या संचालन केले जात आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तिची इंधन व्यवसाय भागीदार ब्रिटिश पेट्रोलियमने (बीपी) संयुक्तरीत्या मुंबईजवळ ‘जिओ-बीपी’ नाममुद्रेअंतर्गत पहिला पेट्रोल पंप सुरू करण्याची गुरुवारी घोषणा करण्यात आली.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये २०१९ सालात केलेल्या बीपीने केलेल्या १ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून, ‘रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड’ या संयुक्त कंपनीतील ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. या कंपनीकडून भारतातील १४०० हून अधिक पेट्रोल पंप आणि रिलायन्सच्या आधिपत्याखाली असलेल्या ३१ विमान इंधन (एटीएफ) भरणा केंद्रांच्या संचालन केले जात आहे.  

‘इंडिया एनर्जी फोरम’च्या व्यासपीठावरून बोलताना बीपीचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड लुनी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, २०२५ पर्यंत पेट्रोल पंपांची संख्या ५,५०० पर्यंत वाढविण्याची योजना आहे. सध्या ‘रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड’कडे १५०० पेट्रोल पंप असून ते ‘जिओ-बीपी’ नाममुद्रेअंतर्गत इंधन वितरण सुरू करतील. रिलायन्स-बीपीकडे ‘केजी-डी ६’ वायू साठ्यामध्ये दोन वायू उत्पादन क्षेत्रे आहेत. तसेच तिसऱ्या प्रकल्पावर काम सुरू असून पुढील वर्षात तेथून उत्पादनाला सुरुवात होईल. भारताच्या नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेच्या १५ टक्के वायूचा पुरवठा करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The first petrol pump under geo bp nameplate near mumbai akp

Next Story
जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती
ताज्या बातम्या