लस-पुरवठा पारदर्शक नसल्याचा किरण मझुमदार-शॉ यांचा ठपका

रमहा ७ कोटी लशींच्या मात्रा नेमक्या कुठे पुरविल्या जात आहेत, हे आम्हाला कळू शकेल काय?

 

करोना प्रतिबंधक लशींच्या उपलब्धेबाबत केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता दाखविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मझुमदार शॉ यांनी देशस्तरावर लशींच्या तुटवड्याची स्थिती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले.

केंद्रीय अर्थमंत्रालयाला उद्देशून किरण मझुमदार-शॉ यांनी मंगळवारी केलेल्या ट्विप्पणीत, ‘लशींचा इतक्या कमी प्रमाणात पुरवठा का होत आहे, हे खूपच काळजीत टाकणारा प्रश्न आहे. दरमहा ७ कोटी लशींच्या मात्रा नेमक्या कुठे पुरविल्या जात आहेत, हे आम्हाला कळू शकेल काय? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संबंधाने सर्वत्र दाटलेली अनिश्चितता संपुष्टात आणण्यासाठी अधिक पारदर्शकता दाखविणे आवश्यक आहे. जर पुरवठ्याचे वेळापत्रक बनविले गेले तर लोकांनाही संयम व धीराने त्यांच्या लसीकरणाची वाट पाहू शकतील,’ अशा शब्दात त्यांनी केंद्रातील सरकारला प्रश्न केले आहेत.

चालू महिन्याच्या प्रारंभी लशींच्या खरेदीबाबत केंद्रातील सरकारकडून कोणतेही नव्याने करार केले गेले नसल्याचे आरोपांचे खंडन करताना, आरोग्य मंत्रालयाने भारत सीरम इन्स्टिट्यूटला आणि भारत बायोटेक या दोन लस निर्मात्या कंपन्यांना मे, जून, जुलै या महिन्यांसाठी लशींच्या पुरवठ्यासाठी दिलेल्या आगाऊ रकमेचा तपशील ट्वीटद्वारे जाहीर केला होता. किरण मझुमदार-शॉ यांनी मात्र प्रत्यक्ष लशींच्या पुरवठ्याच्या अंगाने स्थिती फारशी चांगली नसल्याचे त्यांच्या ट्वीटद्वारे सूचित केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The need for transparency in the supply of vaccines akp

ताज्या बातम्या