भारतातील सर्वात मोठ्या कर्जदार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गेल्या आठवड्यात बेस रेट १० बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवल्यामुळे गोष्टी लवकरच बदलू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुधारित बेस दर १५ डिसेंबर २०२१ पासून ७.५५ टक्के आहे. मूळ दर हा सर्वात कमी व्याजदर आहे ज्यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते.

तुम्ही घर कर्ज (home loans) घेऊन विकत घेण्याचा प्लॅन करत असालं तर हीच योग्य वेळ ठरू शकते. सध्या अनेक अशा बँका ७% पेक्षा कमी व्याज दराने कर्ज देतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरात घसरण सुरु, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव)

उदाहरणार्थ, युनियन बँक ऑफ इंडियाचे रेपो-रेट लिंक्ड होम लोन किमान ६.४% पासून सुरू होते. एसबीआय(SBI) टर्म लोन ६.६५% पासून सुरू होते आणि एचडीएफ (HDFC) बँकेचे गृहकर्ज ६.९५% पासून सुरू होते. बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जावर ६.४०% पासून सुरू होणारा व्याजदर देत आहे. पगारदार कर्जदारांसाठी हे गृहकर्ज दर आहेत. खालील काही बँका कमी व्याजदर देतात ते जाणून घ्या.

(हे ही वाचा: Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर; जाणून घ्या इंधनाचे आजचे दर)

Source: Compiled by ETIG

रेपो-रेट लिंक्ड (rope-rate linked) होम लोन म्हणजे काय?

१ ऑक्टोबर २०१९ पासून, RBI ने बँकांना गृहकर्जाचे व्याजदर बाह्य बेंचमार्कशी जोडणे बंधनकारक केले आहे. बहुतेक बँकांच्या गृहकर्जासाठी रेपो दर हा बेंचमार्क म्हणून वापरला जातो. हे गृहकर्ज व्याजदर रेपो रेट सारख्या बाह्य बेंचमार्कसह लॉकस्टेपमध्ये हलतील.