सौंदर्य प्रसाधन व व्यक्तिगत निगा उत्पादकांनी आपला मोहरा आता पुरुषांसाठी उत्पादने तयार करण्याकडे वळविला आहे. हिंदुस्तान युनिलीव्हर, पी अ‍ॅण्ड जी, व्हीएलसीसीबरोबरीनेच त्वचेच्या निगेच्या क्षेत्रातील गत नऊ दशकांपासून जागतिक अग्रणी निव्हियानेही आता ‘निव्हिया मेन’ ही पुरुष उत्पादनांची नाममुद्रा बाजारात उतरविली आहे.
सौंदर्य उत्पादनांची जगातील सर्वात आकर्षक बाजारपेठ म्हणून भारताचे अलौकिक स्थान हे प्रामुख्यांसाठी स्त्रियांसाठी सादर झालेल्या उत्पादनांमुळे आहे. पण गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत पुरुषांसाठी प्रसाधने तयार करण्याचा बाजार वेगाने वाढत आहे. देशा-विदेशातील अनेक कंपन्यांची या बाजारवर्गावर नजर असून, निव्हियाकडून या सदिच्छा दूत म्हणून अभिनेता अर्जुन रामपालद्वारे हा बाजार आजमावला जाईल.
सध्या पुरुषांसाठी सौंदर्य उत्पादनांचा बाजारहिस्सा ७५० कोटी रुपयांच्या जवळपास आहे आणि वार्षिक ३० ते ४० टक्के वेगाने त्यात वाढ होताना दिसून येत आहे.