'टोयोटा-किर्लोस्कर मोटर'च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Toyota Kirloskar Motor vice chairperson Vikram Kirloskar dies scsg 91 | Loksatta

X

‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगळुरुमध्ये विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाल्याची माहिती कंपनीनेच जाहीर केली

‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ते ६४ वर्षांचे होते (Twitter/hormazdsorabjee)

टोयोटा-किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर याचं निधन झालं आहे. कंपनीनेच मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. विक्रम किर्लोस्कर हे ६४ वर्षांचे होते.

“आमच्या सद्भावना त्यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराबरोबर आहेत. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत,” असं कंपनीने ट्विटरवरुन सांगितलं आहे.

बंगळुरुमध्ये मुख्यालय असलेल्या बायकॉन या औषध क्षेत्रातील कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरपर्सन किरण मुझूमदार-शॉ यांनीही विक्रम किर्लोस्करांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. “विक्रम यांच्या निधनाच्या वृत्तामुळे धक्का बसला आहे. तो माझा फार चांगला मित्र होता. गितांजली, मानसी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे,” असं किरण यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 08:35 IST
Next Story
NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर?