अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने बुधवारी आपल्या धोरण व्याजदरात अर्धा टक्का वाढ केली. देशातील महागाईच्या प्रचंड दबावाला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्चमध्ये किरकोळ चलनवाढ ५.२ टक्क्यांवर पोहोचली होती. तर फेडरल रिझर्व्हला ती २ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. मार्चच्या सुरुवातीला, खुल्या बाजारावरील फेडरल रिझर्व्हच्या समितीने धोरणात्मक व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवला. यूएस फेडरल रिझर्व्हने ४ मे रोजी बेंचमार्क व्याजदरात ५० बेस पॉईंट्सने वाढ केली आहे.

या फेडरल रिझर्व्ह समितीच्या दोन दिवसीय बैठकीनंतर बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात धोरण दर ०.७५ टक्क्यांवरून एक टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. फेडरल रिझर्व्हने २००६ नंतर प्रथमच सलग दुसऱ्या महिन्यात पॉलिसी व्याजदरात वाढ केली आहे. तसेच २००० नंतर प्रथमच पॉलिसी व्याजदरात एकाच वेळी अर्धा टक्के वाढ केली आहे.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आगामी काळात धोरणात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले असून नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत धोरणात्मक व्याजदर २.५ ते २.७५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पॉवेल म्हणाले की फेडरल रिझर्व्हकडे किंमत स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक साधने आणि दृढनिश्चय दोन्ही आहेत.