जागतिक स्तरावर वाहन निर्मितीत जर्मनीच्या फोक्सव्ॉगनने जपानच्या टोयोटाला मागे टाकले असून तिसऱ्या स्थानावर अमेरिकेची जनरल मोटर्स राहिली आहे. फोक्सवॅगनने जानेवारी ते जून २०१५ दरम्यान एकूण ५०.४० लाख वाहनांची निर्मिती केली. तर टोयोटाच्या उत्पादित वाहनांची संख्या या कालावधीत ५०.२० लाख राहिली आहे. ४८.६० लाखांसह जनरल मोटर्स तिसऱ्या स्थानावर आहे. जनरल मोटर्सचे अव्वल स्थान टोयोटाने २००८ मध्ये मोडीत काढले होते. मात्र जपानमध्ये २०११ मध्ये आलेल्या भूकंपानंतर कंपनीच्या वाहन निर्मिती तसेच विक्रीला फटका बसला. पुढील वर्षी टोयोटा पुन्हा एकदा क्रमांक एकच्या स्थानावर आरूढ झाली.