प्रदूषण उत्सर्जनाची मात्रा कमी दाखविणारे सॉफ्टवेअर लबाडीने अंतर्भूत केलेली फोक्सव्ॉगनची वाहने अमेरिकेप्रमाणेच युरोपातही असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अशा दूषित सॉफ्टवेअरयुक्त २००९ ते २०१५ दरम्यान बनावटीची, डिझेल इंजिन असलेली अमेरिकेत कंपनीची ४.८२ लाख वाहने आढळून आली आहेत. युरोपातही अशी वाहने असावीत, असा संशय जर्मनीचे वाहतूकमंत्री अलेक्झांडर डोब्रिन्ट यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याबाबत अद्याप चाचपणी करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.

भारतात तपासणीचे आदेश
नवी दिल्ली : फोक्सव्ॉगनच्या वाहनांची प्रदूषणविषयक चाचणी करण्याचे आदेश भारतात देण्यात आले असून ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) ला तशा सूचना देण्यात आल्याची माहिती अवजड उद्योग सचिव राजन कतोच यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.