झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस (ZEEL) ने बुधवारी संचालक मंडळाच्या बोर्ड बैठकीत सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) आणि ZEEL मध्ये विलीनीकरणाला एकमताने तत्वतः मान्यता दिली आहे. विलीनीकरण केलेल्या कंपनीमध्ये सोनी ११,६०५.९४ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. विलीन झालेल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनीत गोयंका कायम राहतील. विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंटकडे ४७.०७ टक्के हिस्सा असेल. तर सोनी पिक्चर्सचा हिस्सा ५२.९३ टक्के असेल.

दोन कंपन्यांचे टीव्ही व्यवसाय, डिजिटल मालमत्ता आणि प्रोग्राम लाइब्ररी देखील विलीन केली जाणार आहे. त्याच वेळी, ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी केली गेली आहे. एकत्रित कंपनीची ४७.०७ टक्के भागीदारी ZEEL भागधारकांकडे असेल आणि उर्वरित ५२.९३ टक्के SPNI भागधारकांकडे असेल. या करारातील बाकी व्यवहार पुढील ९० दिवसात पूर्ण केले जातील. विद्यमान प्रवर्तक झीला आपली हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुतेक संचालकांना नेमण्याचा करण्याचा अधिकार सोनी समूहाला असेल.

या विलीनीकरणाने भागधारक आणि भागधारकांच्या हितास हानी पोहचणार नाही, असे मंडळाने म्हटले आहे. विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट १.५७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल. विलीनीकरणानंतर, सोनी एंटरटेनमेंट बहुसंख्य भागधारक असणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत, ZEEL च्या भागधारकांची हिस्सेदारी ६१.२५ टक्के असेल तर १.५७५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीनंतर भागभांडवल मध्ये बदल होईल. या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे ४७.०७ टक्के असेल. सोनी पिक्चर्सचे भागधारक ५२.९३ टक्के असल्याचा अंदाज आहे.

“ZEEL ने एक मजबूत वाढीची वाटचाल सुरू ठेवली आहे आणि मंडळाचा ठाम विश्वास आहे की या विलीनीकरणामुळे ZEEL ला आणखी फायदा होईल. या समन्वयाने केवळ व्यवसाय वाढीस चालनाच मिळणार नाही तर शेअरधारकांनाही फायदा मिळू शकेल. त्याच्या भविष्यातही परिणाम होईल असे,” ZEE एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लि.चे अध्यक्ष आर गोपालन यांनी म्हटले आहे.