07 July 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : प्रेरणीय विकर

अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइमची उत्पादने जगभरात ४५ देशांमधील ७००हून अधिक ग्राहक वापरतात.

अजय वाळिंबे

अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज ही विकर (एन्झाइम) व्यवसायातील सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. कंपनीने आपल्या संशोधन आणि विकासातून ६० देशी एन्झाइमपासून जवळपास ४०० उत्पादने विकसित केली आहेत. अत्याधुनिक आणि आवश्यक संशोधनासाठी कंपनीने एवोक्स टेक्नॉलॉजी जीएमबीएच ही जर्मन कंपनी ताब्यात घेतली. कंपनीला एन्झाईमच्या उत्पादनात दोन दशकांपेक्षा जास्त अनुभव असून, एन्झाइम विक्रीच्या बाबतीत अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम पहिल्या १५ जागतिक कंपन्यांमध्ये आहे. तर कंपनीचा देशांतर्गत बाजारहिस्सा जगातील सर्वात मोठय़ा एन्झाइम कंपनी नोवोझाइम्सनंतर म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीचे प्रामुख्याने हेल्थकेअर, न्यूट्रिशन (मानव व प्राणी) आणि बायो-प्रोसेसिंग (अन्न व नॉन-फूड) असे दोन प्राथमिक व्यवसाय आहेत.

अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइमची उत्पादने जगभरात ४५ देशांमधील ७००हून अधिक ग्राहक वापरतात. कंपनीची उत्पादने मानवी-आरोग्य-पोषण, पशू-पोषण, खाद्य प्रक्रिया, बेकिंग, दुग्ध व चीज प्रक्रिया, फळ आणि भाजीपाला प्रक्रिया, धान्य वेचा तयार करणे, धान्य प्रक्रिया, प्रथिने प्रक्रिया, तेल आणि चरबी प्रक्रिया, बायोमास प्रक्रिया, कापड प्रक्रिया, लेदर प्रोसेसिंग, कागद आणि लगदा प्रक्रिया, बायो-इंधन, बायो-कॅटॅलिसिस इ. अनेक क्षेत्रांत वापरली जातात.

कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर केले असून, अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने उलाढालीत सहा टक्के वाढ दाखवून ती ४४४ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात जवळपास १७ टक्के वाढ होऊन तो १२९ कोटींवर गेला आहे. चार वर्षांपूर्वी कंपनीने प्रति शेअर ८८६ रुपये अधिमूल्याने ‘आयपीओ’ आणला होता. त्यानंतर कंपनीने १० रुपयांच्या शेअरचे विभाजन दोन रुपये प्रति शेअर केले. सध्या कंपनीचा प्रति शेअरचा भाव १५० रुपयांच्या आसपास आहे. अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीमधील दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लि.

(बीएसई कोड – ५४००२५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १५५.५०

मायक्रो कॅप प्रवर्तक : वसंत राठी

व्यवसाय : रसायने, अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स

बाजार भांडवल :                                               रु. १,७३६ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  २२५/९१

भागभांडवल भरणा :                                        रु. २२.३४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                                             ५७.८८

परदेशी गुंतवणूकदार                                        ११.१२

बँक/ म्यु. फंड/ सरकार                                    ८.८९

इतर/ जनता                                                   २२.११

पुस्तकी मूल्य :                                                रु. ६६.६

दर्शनी मूल्य :                                                   रु. २/-

लाभांश :                                                         ३०%

प्रति समभाग उत्पन्न :                                    रु. ११.५८

पी/ई गुणोत्तर :                                             १३.५

समग्र पी/ई गुणोत्तर :                                    १०

डेट इक्विटी गुणोत्तर :                                   ०.०३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :                           ५९.९

रिटर्न ऑन कॅपिटल :                                   २४.९९

बीटा :                                                          १.३५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2020 1:05 am

Web Title: advanced enzyme technologies ltd company profile zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : निव्वळ अतार्किक!
2 थेंबे थेंबे तळे साचे : किंमत बुडबुडे ओळख आणि उपयुक्तता
3 बंदा रुपया : स्टोव्हदुरुस्ती ते सिलिंडरनिर्मिती!
Just Now!
X