News Flash

कर्जफेडीनंतर वित्तीय शिस्तीत शिथिलता नको

आजच्या सदरातून मुंबईतील चेंबूरच्या सुमन नगर येथील मटकर कुटुंबाचे आíथक नियोजन जाणून घेऊ. राजेश मटकर (४१) हे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षक कार्यालयात लेखा

| July 7, 2014 01:08 am

आजच्या सदरातून मुंबईतील चेंबूरच्या सुमन नगर येथील मटकर कुटुंबाचे आíथक नियोजन जाणून घेऊ. राजेश मटकर (४१) हे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षक कार्यालयात लेखा परिक्षक आहेत. तर त्यांच्या पत्नी सुषमा (४१) या भारतीय स्टेट बँकेत नोकरी करतात. सध्या त्या बँकेच्या देवनार शाखेत कार्यरत आहेत. या दाम्पत्यास दोन मुली असून मोठी संजना (१८) व धाकटी प्रज्ञा (१६) मार्च २०१५ मध्ये अनुक्रमे बारावी व दहावीच्या परिक्षेला बसतील. मटकर कुटुंबाने २००५ मध्ये सुमन नगर, चेंबूर येथे सदनिका खरेदी केली. सध्या ते याच घरात राहत आहेत. या घरासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड सुरू असून सद्य आíथक वर्षअखेरीस कर्जफेड पूर्ण होईल.  मटकर कुटुंबांकडे स्टेट बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांचे समभाग असून त्यापकी रिलायन्स इंडस्ट्रीजचा सद्यभाव खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा कमी आहे. मटकर कुटुंबाने अन्य गुंतवणूक ही एलआयसीच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केली आहेत.
मटकर कुटुंबाची वित्तीय ध्येये
(प्राधान्यक्रमा नुसार) :
संजनाच्या सीए होण्याचा
शैक्षणिक खर्च    : रु. ५ लाख
प्रज्ञाचा शैक्षणिक खर्च    : रु. ६ लाख
वाहन खरेदी     : रु. ५ लाख
सुषमा व राजेश यांच्या निवृत्तीपश्चात तरतूद साधारण मासिक रु. ५०,००० व्याज मिळेल इतकी बचत करणे
कौटुंबिक युरोप पर्यटन : रु. ५ लाख रुपये (शक्य झाल्यास)
मटकर कुटुंबाला सल्ला :
आíथक नियोजनाचे तीन टप्पे असतात पहिला टप्पा जीवन विमा. सध्याचे सुषमा व राजेश मटकर यांचे विमाछत्र त्यांच्या कौटुंबिक जबाबदारी पाहता पुरेसे नाही. कुटुंबाचे वाढते खर्च आहेत. टर्म प्लान किंवा मुदतीच्या विमा विकत घेण्याचा मर्यादित उद्देश असतो.
घराततील कमावत्या व्यक्तीचा अकाली म्रृत्यू झाल्यास थांबणारया आíथक स्त्रोतामुळे कुटुंबाची वित्तीय उद्दिष्टे साध्य करणे इतपतच असतो. प्रज्ञाच्या वयाच्या २५व्या वर्षांपर्यंत तुमच्या मुलीना तुमच्या कडून आíथक पाठबळ लाभणे आवशयक आहे. म्हणून निदान दहा वर्ष मुदत व पन्नास लाख विमा संरक्षण देणारा टर्मप्लान घ्या.
‘क्लेम सेटलमेंट रेशो’च्या तुलनेत अनुक्रमे एलआयसी (ई टर्म, न्यू अमुल्य जीवन नव्हे) आयसीआयसीआय प्रूडेन्शियल, एचडीएफसी लाईफ (क्लिक टू प्रोटेक्ट) व एसबीआय या अव्वल कंपन्या आहेत. यासाठी प्रत्येकी वार्षकि अंदाजे दहा हजार हप्ता भरावा लागेल. या चार पकी राजेश यांच्यासाठी एसबीआय लाईफ तर सुषमा यांच्यासाठी एलआयसी ई टर्म सर्वात स्वस्त आहेत.
थोडक्यात
तुम्हा दोघांनाही पुढील वर्षभरात वेतन थकबाकी पोटीची रक्कम मिळणार आहे. कर्जफेड ही पूर्ण होणार आहे व वेतनवाढ ही होणार आहे. घर घेताना तुमची सर्व बचत खर्च झाली आहे. तुमच्याकडे आणीबाणी प्रसंगासाठी मोठी रक्कम बाजूला काढणे जरुरीचे आहे. सर्वप्रथम या आणीबाणी प्रसंगी वापरावयासाठी दोन लाखाची तरतूद करा. ही तरतूद करण्यासाठी तुम्ही सध्या करत असलेल्या आवर्ती ठेव योजनेत रक्कम पाच हजार करा. कुटुंबाचे जितके सदस्य तितकी पीपीएफ खाती हवी, असा सल्ला या सदरातून नेहमीच देतो. तुमच्याकडे चार सदस्य व प्रत्येकाचे पीपीएफ खाते आहे सध्या गृह कर्जफेड सुरू असल्याने सुषमा या त्यांच्या पीपीएफ खात्यात फारच कमी रक्कम जमा करतात. आता रोकड सुलभता वाढणार असल्याने ही रक्कम चार हजार करा व मुलींच्या खात्यात ही दरमहा प्रत्येकी एक हजार जमा करा.
दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून एचडीएफसी इंडेक्स फंड, एचडीएफसी इक्विटी फंड पाईनब्रिज इंडिया इक्विटी फंड व एसबीआय इमìजग बिझनेसफंड या चार फंडाचा विचार करा. गृहकर्जफेड झाल्यामुळे व अपेक्षित वेतनवाढीमुळे तुमच्याकडे दरमहा रु. ३२,००० अतिरिक्त शिल्लक राहतील असा अंदाज करून गुंतवणूक सुचविली आहे. आज पगार नक्की किती वाढेल याबाबत सुस्पष्टता नाही. प्रत्यक्षात वेतनवाढ झाल्यानंतर याचा पुनर्वचिार करणे जरुरीचे आहे. तुमच्या नोकरीची अठरा वष्रे शिल्लक आहेत व तुम्ही दोघांना निवृत्तीपश्चात सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे. हे ध्यानात घेऊन हे नियोजन केले आहे.       
वयाच्या ४२व्या वर्षी कर्जमुक्त होण्यासारखी वितीय शिस्त नाही. तुम्ही डोक्यावर कर्ज असल्यामुळे आजपर्यंत वित्तीय शिस्तीचे पालन केलेत म्हणून हे शक्य झाले. सामान्यत: कर्ज फिटल्यानंतर वितीय शिस्तीत शिथिलता येते. ही शिथिलता येणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे. कमीतकमी आणखी पाच वष्रे याच प्रकारच्या वित्तीय शिस्तीचे पालन करणे जरुरी आहे. घर घेण्यात आपली बचत संपून गेली ही तुम्हाला आज जी खंत आहे. ती खंत जोपर्यंत तुम्ही बाळगत आहात तोपर्यंत तुमच्याकडून वितीय शिस्तीचे पालन होत राहील. या शिस्तीचे पालन केलेत तर तुमची वर उल्लेख केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील याची खात्री बाळगा.

(या सदरातून केलेले आíथक नियोजन त्या त्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन केलेले असते. त्या कुटुंबाची सर्वसाधारण पाश्र्वभूमी दिलेली असली तरीही सर्वच गोष्टी शब्दमर्यादेच्या अभावी देता येत नाहीत. त्यामुळे सुचविलेले नियोजन त्या त्या कुटुंबांपुरते असते. या व्यतिरिक्त एखाद्या कुटुंबाने सुचविलेले उत्पादन अथवा सेवेची खरेदी करण्यापूर्वी आपल्या वित्तीय नियोजकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)
  गुंतवणूक :
सध्या मटकर कुटुंबाची गृहकर्जफेड सुरू असल्याने मोठी रोकड सुलभता नाही परंतु गुहकर्ज येत्या वर्षभरात फिटेल्यानंतर त्यांच्याकडे मोठी रोकड सुलभता असेल. परंतु त्याच वेळी मुलींच्या शिक्षणावर व इतर गोष्टींवर खर्च ही वाढेल.
सुषमा या स्टेट बँकेत नोकरी करतात. बँक व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यात वेतनवाढ विषयक बोलणी सुरू आहेत. माध्यमात येणाऱ्या बातम्यांनुसार ८ ते १० टक्के वेतनवाढीचा करार सप्टेंबर – ऑक्टोबर पर्यंत होऊन दिवाळीच्या सुमारास घसघशीत वेतन थकबाकी मिळेल. सातवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यामुळे केंद्र सरकारचे राज्य सरकाचे व एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कर्मचाऱ्यांचे पगार येत्या वर्षभरात वाढतील. तसेच मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांचेसुद्धा वाढतील.

  आरोग्य विमा :
राजेश हे मुंबई महानगर पालिकेत नोकरीला आहेत. मुंबई महानगर पालिकेची आपल्या कर्मचाऱ्यासाठी आजारपणातील खर्चाची काहीही योजना नाही. एखाद्या आजारपणात पालिकेच्या रुग्णालयात भरती झाल्यास रुग्णालयातील खाट मिळण्यास प्राधान्य मिळते. आजारपणात औषध व इतर खर्च कर्मचाऱ्याला स्वत:चा स्वत:च करावा लागतो. पालिकेच्या रुग्णालयाची स्थिती पाहता अपवाद वगळता कोणीही कर्मचारी रुग्णालयात भरती होत नाही.
सुषमा या स्टेट बँकेच्या कर्मचारी आहेत. बँकेच्या नियमानुसार एखादा कर्मचारी आजारपणात रुग्णालयात भरती झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाचा मर्यादित परतावा मिळतो. दोन वर्षांपूर्वी सुषमा यांच्यावर एक शास्त्रक्रिया झाली तेव्हा झालेल्या खर्चापकी साधारण ६० टक्केच पसे परत मिळाले. हे पाहता त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची तीन लाखापर्यंतच्या खर्चाचे आरोग्य विमा छत्र देणारी ‘फॅमेली फ्लोटर मेडीक्लेम पॉलिसी’ घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
राजेश मटकर, सुषमा मटकर    
जीवन सरल : विमा छत्र २ लाख
हप्ता दरमहा रु. ८१७ प्रमाणे मुदत ६ फेब्रुवारी २०१२५
जीवन छाया : विमा छत्र २ लाख
हप्ता वार्षकि रु. ५,५२९ प्रमाणे मुदत ६ मे २०२५
जीवन साथी : ५५,०००
हप्ता वार्षकि रु. ३,६६७ प्रमाणे मुदत २८ जानेवारी २०२९
जीवन सुरभी : १,०५,०००
हप्ता वार्षकि रु. १२,२७५ प्रमाणे मुदत ८ ऑगस्ट २०२७
राजेश मटकर
इंडोंमेंट : विमा छत्र १ लाख
हप्ता वार्षकि रु. ६,४८९ प्रमाणे मुदत १ ऑगस्ट २०२०
जीवन आस्था : विमा छत्र ३ लाख
हप्ता वार्षिक रु. ५०,००० (सिंगल प्रीमियम) मुदत १३ जानेवारी २०१९
जीवन सुरभी : विमा छत्र १,०५,०००
हप्ता वार्षकि रु. १२,२७५ प्रमाणे मुदत ६ ऑगस्ट २०२८
प्रोफीट प्लस :  दोन पॉलिसी एकदा २० हजार व दुसऱ्या वेळेला
१० हजार सध्या किंमत भरलेल्या हप्त्या पेक्षा कमी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:08 am

Web Title: after loan payment do not want the relaxation of financial stern
Next Stories
1 तेजीचे इंजिन!
2 मृत व्यक्तीचे विवरण पत्र वारसदाराने भरावे
3 हर किसान के खुशी के लिये..
Just Now!
X