News Flash

माझा पोर्टफोलियो : उत्कृष्ट गुणवत्तेची कर्जरहित कंपनी

अंबुजा सीमेंट म्हणजे पूर्वाश्रमीची गुजरात अंबुजा सीमेंट.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

गेले काही महिने शेअर बाजाराचा माहोल फार विचित्र आहे. स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स रसातळाला गेल्यानंतर २०२० मध्ये थोडे वर गेल्यानंतर गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला होता आणि आता पुन्हा तेजीचे दिवस येणार अशी आशादेखील निर्माण झाली होती. त्यानंतर करोना विषाणूचा उद्रेक, मग अर्थसंकल्प, कंपन्यांचे निराशाजनक निकाल आणि एकूणच देशाची बिघडलेली अर्थव्यवस्थेची घडी या सगळ्याचा नकारात्मक परिणाम सध्या बाजारावर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत उत्तम लार्ज कॅप कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओला तारू शकतात. आज सुचविलेली अंबुजा सीमेंट ही त्यातलीच एक कंपनी.

अंबुजा सीमेंट म्हणजे पूर्वाश्रमीची गुजरात अंबुजा सीमेंट. १९८३ मध्ये सुरेश कुमार नेओटिया आणि नरोत्तम सेखसारिया या दोन भारतीय उद्योजकांनी हा सीमेंट प्रकल्प सुरू केला. त्यानंतर बहुराष्ट्रीय स्विस कंपनी लाफार्ज होल्सिमने कंपनीच्या भांडवलातील बहुतांशी हिस्सा ताब्यात घेऊन, तिला जागतिक दर्जावर नेऊन ठेवले आहे. सध्या अंबुजा सिमेंटची, सिमेंट उत्पादन क्षमता २६.५५ दशलक्ष टन आहे, ज्यात कंपनीच्या पाच सिमेंट उत्पादन प्रकल्प आणि आठ सिमेंट ग्राइंडिंग युनिट्सचा समावेश आहे.

कंपनीचे चार टर्मिनल्स असलेले स्व-वापरासाठी स्वतंत्र बंदर आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर, कमी खर्चात आणि मोठय़ा प्रमाणात सिमेंटची निर्यात करता येते. ग्राहकांना मूल्यवíधत उत्पादने देण्यासाठी कंपनीने अंबुजा प्लस रूफ स्पेशल, अंबुजा प्लस कूल वॉल्स आणि अंबुजा कॉम्पेक्ससारखी नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली आहेत. नवीन उत्पादने ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करतातच, परंतु कार्बनचा ठसा कमी करण्यासही मदत करतात.

कंपनीचे डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र सप्टेंबर २०१९ साठी संपलेल्या नऊमाहीपर्यंत कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. या तिसऱ्या तिमाहीच्या कालावधीत कंपनीने २,६२६.११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २३४.६१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ३१ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने नुकतीच कोर्टाच्या परवानगीने डर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतची उपकंपनी अंबुजा सीमेंटमध्ये विलीन करून घेतली आहे.

पायाभूत सुविधांसाठी आगामी पाच वर्षांत भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. त्यामुळे अंबुजा सीमेंटसारखी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली, कुठलेही कर्ज नसलेली आणि १.६ बीटा असलेली कंपनी एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक ठरेल.

अंबुजा सीमेंट लिमिटेड

(बीएसई कोड – ५००४२५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २०५.४०

लार्ज कॅप

उत्पादन/व्यवसाय : सीमेंट

बाजार भांडवल : रु. ४०,७८५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :  रु.  २४४ / १८५

भागभांडवल : रु. ३९७.१३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६३.३९

परदेशी गुंतवणूकदार  १३.४७

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १६.३८

इतर/ जनता    ६.७६

पुस्तकी मूल्य : रु. ११६.४

दर्शनी मूल्य :   रु. २/-

लाभांश :  ७५%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ८.५६

पी/ई गुणोत्तर : २३.९

समग्र पी/ई गुणोत्तर :    २०

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २४.६

रिटर्न ऑन कॅपिटल : १५.०३

बीटा :    १.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 3:00 am

Web Title: ambuja cement company with outstanding quality loans abn 97
Next Stories
1 नावात काय : आर्ब्रिटाज
2 बाजाराचा तंत्र कल : तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी..
3 अर्थ वल्लभ : गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!
Just Now!
X