19 February 2020

News Flash

प्रारंभिक भागविक्रीच्या किमतीला उपलब्धता

आज अमेरिका जगातील मत्स्यपालन उत्पादनांचा सर्वात मोठा आयातदार आहे (क्रिसिल रिपोर्ट).

|| अजय वाळिंबे

वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली अ‍ॅपेक्स फ्रोजन फूड्स दोनच वर्षांपूर्वी ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात आली. कंपनी जलीय जीवांचे (अ‍ॅक्वाकल्चर) उत्पादन व निर्यात करते. कंपनी आपली उत्पादने अन्न कंपन्या, किरकोळ विक्रेता साखळी, रेस्टॉरंट्स, क्लब स्टोअर आणि वितरकांना पुरविते. अ‍ॅपेक्सकडून दोन प्रकारच्या कोळंबी तयार केल्या जातात,  व्हाइटलेग कोळंबी (लिटोपेनेयस व्हॅनामेनी) आणि ब्लॅक टायगर कोळंबी (पेनेस मोनोडॉन). कंपनीची रेडी-टू-कूक उत्पादने अमेरिका, ब्रिटन आणि विविध युरोपियन देशांच्या विकसित बाजारपेठेत बे फ्रेश, बे हार्वेस्ट आणि बायप्रेमियम या प्रमुख ब्रँडद्वारे पुरविली जातात. कंपनीने अमेरिकेची बाजारपेठ उत्तम विकसित केली आहे. आज अमेरिका जगातील मत्स्यपालन उत्पादनांचा सर्वात मोठा आयातदार आहे (क्रिसिल रिपोर्ट).

कंपनीचा हॅचरी प्रकल्प आंध्र प्रदेश येथे सुमारे १,०३२ एकर जागेवर असून कंपनी सध्या काकीनाडा येथे वार्षकि ९,२४० मेट्रिक टन तयार उत्पादनांवर प्रक्रिया करीत आहे. तर बापटला येथे अतिरिक्त प्री-प्रोसेसिंग आणि प्रक्रियेची व्यवस्था आहे. कंपनीचा प्रकल्प ऑस्ट्रेलिया आणि कस्टम युनियन वगळता सर्व देशांच्या निर्यात तपासणी परिषदेने निर्यातीसाठी मंजूर केला आहे.

विद्यमान २०१९-२० आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल कंपनीचे जाहीर झाले असून, उत्पन्नात (२२२ कोटी रु.) ७.३ टक्क्यांनी घट झाली असून, नक्त नफ्यातही ६०.८ टक्के घट झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ तसेच अमेरिकेतून कमी झालेली मागणी ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मात्र कंपनीने आपला वार्षकि २०,००० मेट्रिक टनांचा उत्पादन वाढीचा प्रकल्प नुकताच पूर्ण केला असून त्याचा आगामी काळात फायदा झालेला दिसून येईल. तसेच अमेरिकेतूनही उत्पादनांना मागणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सध्या जवळपास आयपीओच्या किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on September 2, 2019 2:33 am

Web Title: apex frozen foods stock market akp 94
Next Stories
1 बाप्पांच्या स्वागतासाठी बाजार सज्ज!
2 बाजार सावरला अखेर
3 किमान दोन तिमाही वाट पाहावी लागेल..
Just Now!
X