11 August 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : ‘नल से जल’ महत्त्वाकांक्षेची सुकरता!

कंपनी प्रामुख्याने सीपीव्हीसी, पीव्हीसी आणि एचडीपीई पाइप्स आणि फिटिंग्जचे उत्पादन करते.

अजय वाळिंबे

सुमारे २० वर्षांपूर्वी म्हणजे सन २००० मध्ये अपोलो पाइप्सने वार्षिक ३,६०० मेट्रिक टन क्षमतेने यू-पीव्हीसी पाइप्सचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर वाढत्या मागणीनुसार कंपनीने सीपीव्हीसी पाइप्सच्या व इतर संबंधित उत्पादनांची उत्पादन क्षमता आणि वितरण विस्तार केले आहे. सध्या कंपनीकडे वर्षांकाठी ६०,००० टन पॉलिमर वापरण्याची क्षमता असलेल्या १९ एक्स्ट्रुझन लाइन आहेत.

उत्तर प्रदेशातील दादरी आणि सिकंदरबाद, गुजरातमध्ये अहमदाबाद, तर कर्नाटकातील टुमकुर येथे कंपनीचे प्रकल्प आहेत. उत्तर भारतात एकाच छताखाली एकाच ठिकाणी सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून ते अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि चाचणी उपकरणासह १०० टक्के पॉवर बॅकअपसह सुसज्ज आहे. अपोलो पाइप्स उत्तम ब्रँड व्हॅल्यू असणारी भारतातील आघाडीची कंपनी असून प्रमुख पाइपिंग सोल्युशन्सपैकी एक आहे. वार्षिक उत्पादन क्षमता ८४,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवितानाच कंपनी भारतभर वितरण आणि सेवा नेटवर्क वाढवत आहे. सध्या कंपनीचे ४५० डिलर्स आणि १५० वितरक आहेत.

कंपनी प्रामुख्याने सीपीव्हीसी, पीव्हीसी आणि एचडीपीई पाइप्स आणि फिटिंग्जचे उत्पादन करते. कंपनीची उत्पादनाची श्रेणी १५ मिमी ते ४०० मिमी व्यासापर्यंत विस्तृत आहे. उत्तम पाइपिंग सोल्युशनसह बाजारामध्ये सतत काम केल्यामुळे आज अपोलो पाइप्स उत्तर भारतातील आघाडीची पीव्हीसी फिटिंग्ज उत्पादक मानली जाते. कंपनीची उत्पादने अनेक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या अनुप्रयोगांसाठी वापरली जातात. एपीएल पीव्हीसी पाइप्स, केसिंग पाइप्स, कॉलम पाइप्स आणि स्प्रिंकलर पाइपिंग सोल्युशन्स सिंचनासाठी वापरली जातात. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील मागणी पूर्ण करण्यासाठी एपीएल एचडीपीई पाइप्स आणि फिटिंग्ज, पीएलबी टय़ूब, पीव्हीसी पाइप्स इ. उत्पादने पुरवते. इतर औद्योगिक, मलनि:सारण, गटार व पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्रातही कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो.

मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ४०७.९६ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून २८.५३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सरकारने ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमासाठी ३.६० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४ पर्यंत ‘नल से जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे अपोलो पाइप्ससारख्या कंपन्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी राहील. मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून अपोलो पाइप्सचा विचार करावा.

अपोलो पाइप्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५३१७६१)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ३१४.१०

मायक्रो कॅप

प्रवर्तक : सुदेश समूह

उद्योग क्षेत्र : पीव्हीसी पाइप्स

बाजार भांडवल : रु. ४१२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :       रु.  ५२५ / २२०

भागभांडवल भरणा : रु. १३.११ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक       ५२.०३

परदेशी गुंतवणूकदार ०४.५२

बँक/ म्यु. फंड/ सरकार     १०.१५

इतर/ जनता ३३.३०

 

पुस्तकी मूल्य :      रु. २३३.८२

दर्शनी मूल्य :       रु. १०/-

लाभांश :     — %

प्रति समभाग उत्पन्न : रु. २१.७२

पी/ई गुणोत्तर :     १४.४५

मग्र पी/ई गुणोत्तर : २०

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.२५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ७.२१

रिटर्न ऑन कॅपिटल : १२.६६

बीटा :       ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:07 am

Web Title: apollo pipes ltd company profile zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : दर्जा-किमतीतही ‘चीनला मात’
2 अर्थ वल्लभ : शिवामूठ भाग- १ बदकांचे गुपित
3 कर बोध  : करदात्यांच्या व्यवहारांचे ‘माहिती-स्रोत’
Just Now!
X