07 April 2020

News Flash

नावात काय : आर्ब्रिटाज

दोन देशांतील चलनाच्या किमतीत असलेला फरक आर्ब्रिटाजची संधी निर्माण करतो

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

एखाद्या सिक्युरिटीचे दोन वेगवेगळ्या बाजारपेठेतील मूल्य कमी-जास्त असते तेव्हा त्या किमतीतील फरक हा अल्पकाळात फायदा मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. एकाच मूल्याच्या व एकाच संख्येच्या सिक्युरिटी एका बाजारात खरेदी करून त्या दुसऱ्या बाजारात विकल्या तर नफा कमावता येतो यालाच ‘आर्ब्रिटाज’ असे म्हणतात. थोडक्यात, एक कमोडिटी मुंबईच्या बाजारात आणि दिल्लीच्या बाजारात वेगवेगळ्या किमतीला विकली जात असेल तर मुंबईच्या बाजारात खरेदीचा सौदा करायचा व दिल्लीच्या बाजारात विक्रीचा सौदा करायचा आणि यातील फरकाचा लाभ पदरात पाडून घ्यायचा. उदाहरणार्थ, समजा सोने किंवा तत्सम कमोडिटी मुंबईच्या बाजारात पाचशे रुपयाला विकली जाते आणि दिल्लीच्या बाजारात पाचशे पन्नास रुपयाला विकली जाते तर मुंबईच्या बाजारातून खरेदी करून दिल्लीच्या बाजारात त्याची विक्री करायची यात पन्नास रुपये प्रति युनिट असा ‘आर्ब्रिटाज’ संधीचा नफा मिळतो. पण यातील खर्चसुद्धा विचारात घ्यावा लागतो. हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी जो ब्रोकरेजचा खर्च येतो तो वजा जाऊन आपल्या हातात काही तरी पडले पाहिजे. जर दोन्ही बाजारांतील किमतीतील फरक फारच कमी असेल तर आर्ब्रिटाजची संधी फारशी फायदेशीर ठरत नाही. आर्ब्रिटाज संधी बाजारात फारच कमी वेळासाठी टिकते. याचे कारण या संधीचा फायदा उठवण्यासाठी जसजसे खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सुरू होतात तसे मागणी आणि पुरवठा बदलून दोन्ही बाजारांतील दरामधला फरक कमी कमी होऊ लागतो. वरील उदाहरणात दिल्ली व मुंबईतील दरातील फरक पन्नास रुपये होता. जसजसे मुंबईत खरेदीचे प्रमाण आणि दिल्लीत विक्रीचे प्रमाण वाढेल तसा मुंबईतील दर वाढायला लागेल आणि दिल्लीतला दर कमी व्हायला लागेल आणि आर्ब्रिटाजची संधी नाहीशी होईल.

दोन देशांतील चलनाच्या किमतीत असलेला फरक आर्ब्रिटाजची संधी निर्माण करतो. असे समजा की, एखाद्या चलनाची, डॉलरची किंमत लंडनच्या बाजारपेठेत न्यूयॉर्कपेक्षा स्वस्त आहे तर लंडनमधून डॉलर खरेदी करून आणि त्याची न्यूयॉर्कमध्ये विक्री केल्यास अल्पकाळात नफा कमावता येऊ शकतो.

* लेखक वित्तीय नियोजनकार वअर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:10 am

Web Title: article on arbitrage fund abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी..
2 अर्थ वल्लभ : गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!
3 थेंबे थेंबे तळे साचे : P 2 P लेंडिंग आहे तरी काय
Just Now!
X