29 October 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : मायक्रो कॅप, पण गुणवत्ता आणि कामगिरीत श्रेष्ठ!

रमेश देसाई यांनी १९९२ मध्ये स्थापन केलेली, भारत पेरेन्टेरल्स लिमिटेड ही गुजरातमधील एक औषध निर्माता कंपनी आहे

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

रमेश देसाई यांनी १९९२ मध्ये स्थापन केलेली, भारत पेरेन्टेरल्स लिमिटेड ही गुजरातमधील एक औषध निर्माता कंपनी आहे. ही कंपनी स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश जागतिक स्तरावरील परवडणारी औषधे उत्पादित करणे व गुजरातमधील फार्मा कंपन्यांसाठी कंत्राटी उत्पादन करणे हा आहे. कंपनी अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्ससाठी समर्पित सुविधा असलेली संशोधन कंपनी म्हणून कार्यरत आहे. गेली २८ वर्षे कंपनी बडोदा येथील आधुनिक प्रकल्पातून फार्मास्युटिकल फॉम्र्युलेशन उत्पादनांचे विस्तृत स्पेक्ट्रम तयार करण्यासाठी समर्पित आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनात सामान्य, ईएनटी, सेफोलोस्पोरीन, बी-लैक्टम आणि पशू वैद्यकीय औषधांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने गोळ्या, कॅप्सुल्स, ओरल लिक्विड, इंजेक्शन, ड्राय सिरप तसेच सॅशे आदींचा समावेश आहे.

कंपनीच्या ग्राहक मांदियाळीत छोटय़ा बायोफार्मास्युटिकल्स स्टार्टअप्सपासून भारतातील काही मोठय़ा म्हणजे यूएस विटामीन, अलेम्बिक, वेक्सफोर्ड हेल्थ, मॅक्लॉइड्स, बोर्स इ. औषध कंपन्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता राखण्यासाठी कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अनॅलिटिकल डेव्हलपमेंट लॅबॉरटरी उभारत आहे.

कुठलेही कर्ज नसलेल्या भारत पेरेन्टेरल्सने आर्थिक कामगिरीत सातत्य राखले आहे. गेल्या आर्थिक वर्षांतही कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने २२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर कोविड काळातही, म्हणजेच जून २०२० अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ५३.९३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६.३८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. मुंबई शेअर बाजार – बीएसईवर नोंदणी असलेली, केवळ ०.३ बीटा असलेली ही मायक्रो कॅप कंपनी मध्यमकालीन आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

भारत पेरेन्टेरल्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५४१०९६)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ३९४.००

मायक्रो कॅप

प्रवर्तक : भरत देसाई

उद्योग क्षेत्र : औषध निर्मिती

बाजार भांडवल : रु. २२६ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  १,४४०/८०६

भागभांडवली भरणा : रु. ५.७३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७४.४२

परदेशी गुंतवणूकदार  —

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ०.०१

इतर/ जनता २५.५७

पुस्तकी मूल्य :  रु.२१५

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :   — %

प्रति समभाग उत्पन्न : रु. ४७.८

पी/ई गुणोत्तर :     ८.३

समग्र पी/ई गुणोत्तर: १९.८

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.०१

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर:    ४८.१

रिटर्न ऑन कॅपिटल : ३२.१

बीटा:      ०.३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 1:00 am

Web Title: article on bharat parenterals ltd stock abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : हिरवे अंकुर!
2 अर्थ वल्लभ : थकलेल्यांना निरोप आणि नव्यांची शिफारस 
3 कर बोध : लेखापरीक्षण आणि प्राप्तिकर कायदा
Just Now!
X