22 February 2020

News Flash

अर्थ वल्लभ : वावटळीतील उल्लेखनीयता

डीएसपी टॅक्स सेव्हर फंडाचे निधी व्यवस्थापन अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे जुलै २०१५ मध्ये आले.

निधी व्यवस्थापक : रोहित सिंघानिया

वसंत माधव कुळकर्णी

डीएसपी टॅक्स सेव्हर फंड

कर वजावटीसाठी करायच्या गुंतवणूक साधनांपैकी ‘ईएलएसएस फंड’ हे अन्य कर वजावटपात्र साधनांपैकी सर्वात कमी कालावधी असणारे गुंतवणूक साधन आहे. डीएसपी टॅक्स सेव्हर फंड हा २०१५ पासून ‘लोकसत्ता- कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा भाग राहिला आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापन अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे जुलै २०१५ मध्ये आले. या फंड घराण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचे निधी व्यवस्थापन रोहित सिंघानिया २०१२ पासून पाहात आले आहेत.

या फंड घराण्याच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांत लक्षणीय बदल झाले आहेत. मे २०१८ मध्ये, ब्लॅकरॉकआणि डीएसपीने हे दशकभरापासून सुरू असलेल्या भागीदारीतून वेगळे झाले. त्या पश्चात फंड घराण्याच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर असलेल्या एस. नागनाथ आणि त्यांच्यापाठोपाठ अनुप माहेश्वरी आणि निधी व्यवस्थापक हरीश झवेरी यांनी फंड घराण्याला अलविदा केला, तर अतुल भोळे आणि गोपाळ अग्रवाल हे अनुक्रमे टाटा म्युच्युअल फंडातून दाखल झाले. फंड घराणे हे अशासाठी महत्त्वाचे असते, कारण व्यक्ती बदलल्या तरी गुंतवणुकीची तत्त्वे तीच असतात. विद्यमान निधी व्यवस्थापकांनी रणनीतीत आपल्या आधीच्या निधी व्यवस्थापकांच्या रणनीतीत फारसे बदल केले नाहीत.

समभागांची निवड :

अ) संख्यात्मक विश्लेषण जसे की, व्यवसायाचे मॉडेल, नफ्याची टक्केवारी, रोकड सुलभता संभाव्य धोके, मूल्यांकन, उत्ससर्जनातील वाढ

ब) गुणात्मक विश्लेषण जसे की व्यवस्थापन गुणवत्ता, गुंतवणुकीतील संधी आणि जोखीम समज यांसारख्या अमूर्त घटकांवर निर्भर करते.

कंपन्यांच्या भविष्यातील कमाईवर वर्तमान मूल्यांकन लक्षात घेऊन समभागांच्या निवडीचा निकष भविष्यातील उत्सर्जन वाढ हाच असल्याचे दिसून येते. फंड ‘बॉटम-अप’ पद्धतीने चालविला जातो. वैश्विक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर काळजीचे कारण असलेल्या निधी व्यवस्थापकांनी दोन वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी गुंतवणूक टाळली असली तरी रुपयाच्या अवमूल्यानाच्या भीतीने संरक्षणात्मक रणनीती म्हणून कमीत कमी गुंतवणूक हे बाजारातील संभाव्य घसरणीची फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यास हानी पोहोचू नये हे आहे. कॉर्पोरेट बँका, मिड कॅप, औषध निर्माण आणि निवडक एनबीएफसी व विमा क्षेत्रातील कंपन्यांतील फंडाची गुंतवणूक विस्तृत बाजाराच्या वावटळीत उल्लेखनीय राहिली. बाजारात नेहमीच अर्थव्यवस्थेबाबत मत-मतांतरे असतात. परंतु मूलभूत गोष्टींशी एकनिष्ठ राहिल्यास स्वस्त पण कमकुवत व्यवसाय यांच्यापासून निधी व्यवस्थापकांनी फंडाला दूर ठेवले आहे.

तथापि, इतर जोखीम अचानक आणि अनपेक्षित असू शकतात, जसे काही आठवडय़ांपूर्वी अमेरिका-इराणमध्ये झालेली युद्धसदृश परिस्थिती, करोना विषाणूचा बाजारावर परिणाम होणे वगैरे. जोखमीच्या या दुसऱ्या बाजूकडे डोळेझाक करता येणार नाही. सध्या चार तारांकित असलेल्या या फंडाची तारांकित सुधारणा नजीकच्या काळात शक्य आहे.

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

shreeyachebaba@gmail.com

First Published on February 10, 2020 3:08 am

Web Title: article on elss funds abn 97
Next Stories
1 करबोध : अर्थसंकल्पातील प्राप्तिकर तरतुदींकडे कसे पाहाल?
2 बंदा रुपया : रिक्षाचालक ते अडीचशे ट्रेलर-ट्रकचा मालक!
3 माझा पोर्टफोलियो : आयातपर्यायी क्षेत्रातील गुणवत्ता..