आशीष ठाकूर

अर्थसंकल्प सादर झाल्यावर दिवसांतर्गत सेन्सेक्सवर हजार अंशांची आणि निफ्टीवर ३०० अंशांची घसरण झाली. या घसरणीनंतर येणाऱ्या दिवसात हलकीशी सुधारणा ही सेन्सेक्सवर ४०,००० ते ४०,८०० आणि निफ्टीवर ११,८०० ते १२,००० असेल असे गेल्या लेखात सूचित केले होते. हीच अपेक्षित सुधारणा आपण गेल्या आठवडय़ात अनुभवलीदेखील. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,१४१.८५

निफ्टी : १२,०९८.३५

अर्थसंकल्पानंतर निर्देशांकात घातक चढ-उतार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील निर्देशांकाची संभाव्य वाटचाल कशी असेल त्याचा आज आढावा घेऊ या. येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला सेन्सेक्सवर ४१,८०० आणि निफ्टीवर १२,३००चा अडथळा असेल, तर आधार हा सेन्सेक्सवर ४०,८५० आणि निफ्टीवर १२,०५० असा असेल. हा आधार राखण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४०,२०० आणि निफ्टीवर ११,८५० असेल. या स्तराचा आधार घेत निर्देशांकात पुन्हा सुधारणा ही सेन्सेक्सवर ४१,५०० आणि निफ्टीवर १२,२०० पर्यंतची असेल. या स्तरावरून मंदीचे शेवटचे आवर्तन सुरू होऊन निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,७०० आणि निफ्टीवर ११,५०० असेल. अशी ही निर्देशांकावरची तेजी-मंदी चक्राची संभाव्य वाटचाल असेल.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) बॉम्बे डाइंग मॅन्युफॅक्चरिंग   कंपनी लिमिटेड

* तिमाही निकाल – सोमवार, १० फेब्रुवारी

* शुक्रवार, ७ फेब्रुवारीचा भाव – ९०.१० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ८२ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८२ रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य १०० रुपये. भविष्यात ८२ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ११५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ८२ ते १०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ८२ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७० रुपयांपर्यंत घसरण.

२) गेल इंडिया लिमिटेड

* तिमाही निकाल – सोमवार, १० फेब्रुवारी

* शुक्रवार, ७ फेब्रुवारीचा भाव – १२३ रु.

* निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – १२२ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२२ रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य १३० रुपये. भविष्यात १२२ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १४५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १२२ ते १३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : १२२ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ११४ रुपयांपर्यंत घसरण.

३) ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड

* तिमाही निकाल – सोमवार, १० फेब्रुवारी

* शुक्रवार, ७ फेब्रुवारीचा भाव – ७८६.९० रु.

* निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – ७७० रु.

अ)उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७७० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ८३५ रुपये. भविष्यात ७७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८७० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७७० ते ८३५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ७७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७२० रुपयांपर्यंत घसरण.

४) थ्री एम इंडिया लिमिटेड

* तिमाही निकाल – मंगळवार, ११ फेब्रुवारी

* शुक्रवारचा (७ फेब्रु.) भाव – २४,०५६ रु.

* निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – २४,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४,००० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य २५,४०० रुपये. भविष्यात २४,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २८,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २४,००० ते २५,४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : २४,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २२,३०० रुपयांपर्यंत घसरण.

ल्ल लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.