आíथक नियोजनासंदर्भातील शंका आणि या शंकांचे निरसन करणारे एका आíथक नियोजकाचे हे मासिक सदर..

कोणत्याही व्यक्तीचे खरे शिक्षण नोकरीला सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या अनुभवातून होते असे म्हणतात. माझेही तसेच झाले. मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यानंतर बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स व त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्युरन्स या दोन गरसरकारी विमा कंपन्यांतून मी अनुभव घेतला. या काळात बचत, विमा व पेन्शन या गोष्टीचा सखोल अभ्यास केला. तसे पहिले तर वित्तीय नियोजन गरजेनुसार या तीन गोष्टींभोवतीच फिरत असते.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, माझे उत्पन्न मासिक २० हजार आहे. मला वित्तीय नियोजनाची आवश्यकता आहे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी नियोजन म्हणजे काय हे समजावून घेणे गरजेचे आहे.

आíथक नियोजनाची व्याख्या उपलब्ध असलेल्या पशाचा कार्यक्षम वापर असा करता येईल, यासाठी जीवनशैलीत बदल न करता गरजांची प्राथमिकता ठरविणे जरुरीचे असते. या प्राथमिकता व आíथक ध्येयांची पूर्ती होण्यासाठी योग्य विमा व गुंतवणूक साधनांची निवड करण्यास आíथक नियोजक (Financial Planner) साहाय्य करतो. दरम्यान, अचानक उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगाला कसे तोंड द्यावे याचा विचार या नियोजनात केलेला असतो जेणेकरून आपल्या आíथक ध्येयांसाठी केलेल्या गुंतवणुकीस धक्का पोहोचणार नाही.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आíथक ध्येयांचे अग्रक्रम वेगवेगळ्या वयोगटात खालीलप्रमाणे असतात. या ध्येयांची क्रमवारी ठरविणे मात्र आवश्यक असते.

वर उल्लेख केलेल्या विविध टप्प्यांचा विचार करून आíथक नियोजन केले जाते.

  • आकस्मिक खर्चाचे नियोजन

आकस्मिक उद्भवणारे वैद्यकीय खर्च तसेच सध्याच्या अशाश्वत जगात नोकरी गमावण्याचा प्रसंग आल्यास, आधी सहा महिन्यांच्या खर्चाचे नियोजन करून नंतर उर्वरित गुंतवणुका केल्या जातात. या नियोजनात कर्जाचे हप्ते व घरखर्चाचा प्रामुख्याने समावेश असतो.

  • विम्याचे नियोजन

यात प्रामुख्याने आयुर्विमा व आरोग्य विम्याचा समावेश होतो. योग्य रकमेचा विमा काढण्यासाठी विमा खरेदी इच्छुकाची ‘ह्युमन लाइफ व्हॅल्यू’ लक्षात घेऊन विमा रक्कम ठरविली जाते. या रकमेइतके विमा संरक्षण मिळण्यासाठी योग्य विमा उत्पादन व विमा संरक्षणाचा कालावधी लक्षात घेतला जातो.

  • जोखीम स्वीकारण्याची क्षमता (रिस्क प्रोफायिलग)

एकच वयोगटातील व समान आíथक स्तरातील दोन व्यक्तींची जोखीम स्वीकारण्याची क्षमता वेगवेगळी असते, असू शकते. वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांत केलेल्या गुंतवणुका या वेगवेगळ्या जोखमीच्या आधीन राहून केलेल्या असतात. या गुंतवणुकीतून मिळणारा परताव्याचा दरही कमी-अधिक असतो. बँकांच्या मुदत ठेवी ते समभाग या गुंतवणूक साधनांतील जोखीम अल्प ते सर्वाधिक या क्रमाने वाढणारी आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या साधनांतील गुंतवणुकीचे प्रमाण ठरविण्याची आवश्यकता असते. तरुण वयात अधिक जोखीम असलेली तर सेवानिवृत्तीच्या जवळ सर्वात कमी जोखीम असलेल्या गुंतवणूक साधनाची निवड करणे आवश्यक असते.

  • बचतीचे योग्य नियोजन

कष्टाने कमावलेल्या पशाचे नियोजन कार्यक्षम असण्याची गरज आहे. वित्तीय ध्येये व जोखीम स्वीकारण्याची क्षमता या दोन गोष्टींचा विचार करून वेगवेगळे पर्याय गुंतवणूकदाराला सुचवून त्यातील धोक्यांची जाणीव करून दिली जाते. मुदत ठेवी, पीपीएफ, सोने, स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड यामधून योग्य प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

  • वारसा हक्काचे नियोजन

कमावलेल्या किंवा आपल्याकडे आलेल्या वारसा हक्काचे हस्तांतर होणे हासुद्धा आíथक नियोजनाचा एक भाग असून नियोजनाचा हा शेवटचा टप्पा असतो.

या सर्व गोष्टींचा विचार आगामी वर्षांत करणार आहोत. या सदरात वाचक सहभाग महत्त्वाचा आहे. तेव्हा तुमच्या सूचना जरूर पाठवा ही विनंती.

 

वय वष्रे                  प्राथमिकता

२० ते २५      नोकरीला सुरुवात, घर घेणे, लग्न

३५ ते ४५      नोकरीतील बदल, मुलांचे शिक्षण

४५ ते ५५      एखादे सेकंड होम, मुलांची लग्ने

५५ ते ६०      जमविलेल्या पशांचा योग्य विनियोग

६०           नंतर सेवानिवृत्ती, वारसा हक्क नियोजन इ.

 

– किरण हाके
kiranhake@fingenie.co.in
लेखक उाढ उट पात्रताधारक व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार