अजय वाळिंबे

भारतातील सरकारी तेल वितरण कंपन्यांतील आघाडीची हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) ही ‘महारत्न’ श्रेणीतील कंपनी आहे. एचपीसीएलकडे इंधन आणि विविध प्रकारच्या पेट्रोलियम पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या दोन प्रमुख रिफायनरीज् आहेत, त्यापैकी एक मुंबईत (७.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमता) आणि दुसरी विशाखापट्टणम येथे (८.३ मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमता) आहे. एचपीसीएल ४२८ टीएमटी क्षमतेसह आंतरराष्ट्रीय मानदंडातील ल्युब बेस ऑइल उत्पादित करणारी देशातील सर्वात मोठी ल्युब रिफायनरी चालवत आहे. भारतातील एकूण ल्युब बेस ऑइल उत्पादनांपैकी या ल्युब रिफायनरीचा वाटा ४० टक्के आहे. याखेरीज एचपीसीएलने मित्तल एनर्जी इन्व्हेस्टमेंटच्या सहकार्याने भठिंडा येथे ११.३ मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेची रिफायनरी स्थापन केली असून संयुक्त कंपनीच्या भागभांडवलात ४८.९९ टक्के गुंतवणूक केली आहे. संयुक्त भागीदारीतील मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्समध्ये तिने साधारण १६.९५ टक्के गुंतवणुकीसह १५ मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेची रिफायनरी स्थापन केली आहे.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
ship
इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा; १७ भारतीय कर्मचारी संकटात
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीसाठी ३,३७० किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाइन नेटवर्क असलेली एचपीसीएल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आपली उत्पादने विपणन आणि वितरण करण्यासाठी एचपीसीएलची मोठय़ा शहरांमधील १४ क्षेत्रीय कार्यालये आणि १२८ प्रादेशिक कार्यालये असून ही सर्व कार्यालये टर्मिनल, पाइपलाइन नेटवर्क, एव्हिएशन सर्व्हिस स्टेशन, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स, इनलँड रिले डेपो आणि रिटेल आऊटलेट्स, ल्यूब आणि एलपीजी डिस्ट्रिब्युटरशिपसह सुसज्ज आहेत.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू असली तरीही आपल्याकडील पेट्रोल/ डिझेल विपणन कंपन्या मात्र चांगली कामगिरी करीत आहेत. करोनामुळे वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आणि इंधनाची मागणी घटण्याचा साहजिकच कंपनीच्या कामगिरीवर विपरीत परिणाम अपेक्षित होता; परंतु कंपनीचे आर्थिक निष्कर्ष उत्तम आहेत. तसेच आता हवाई वाहतूक पूर्ववत होत असून रस्ते आणि रेल्वे वाहतूकदेखील सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने २६९,०९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,६३९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता, तर जून २०२० साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ३७,७८२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,२५२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. आगामी कालावधीत कंपनीच्या डिझेल आणि पेट्रोलच्या विपणन मार्जिनमध्ये वाढ अपेक्षित असून त्यामुळे येणाऱ्या तिमाहीतदेखील कंपनीची कामगिरी उत्तम राहण्याची शक्यता आहे.

आधुनिकीकरणासाठी एचपीसीएलने वाढती ऊर्जा मागणी, तांत्रिक उन्नतीकरण आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात विस्तार आणि विविधीकरणासाठी महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या आहेत. माहुल आणि विशाखपट्टणम येथील रिफायनरीजचे विस्तारीकरण, विपणन आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने मोठी भांडवली गुंतवणूक केली आहे. यांत मुंबईच्या रिफायनरीची क्षमता वार्षिक ६.५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून ९.५ दशलक्ष मेट्रिक टन, तर विशाखापट्टणम येथील क्षमता वार्षिक ८.३ दशलक्ष मेट्रिक टनांवरून १५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याखेरीज एचपीसीएल संयुक्त उपक्रमातील कंपन्यांमार्फत तीन क्रॉस-कंट्री नैसर्गिक गॅस पाइपलाइन (मेहसाणा ते भठिंडा, भठिंडा ते श्रीनगर आणि मल्लवाराम ते भिलवाडा) च्या विकासातही भाग घेत आहे. जीएसपीएल इंडिया गॅसनेट लिमिटेड (जीआयजीएल) आणि जीएसपीएल इंडिया ट्रान्सको लिमिटेड (जीआयटीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे.

रिफायनिंगवरील नफ्याचे उत्तम मार्जिन, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या घसरलेल्या परंतु स्थिर किमती आणि विपणन क्षेत्रातील वाढता नफा यामुळे येतील दोन आर्थिक वर्षे एचपीसीएलसाठी उत्तम असतील अशी आशा आहे. सध्या २१० च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला १२-१५ महिन्यांत ३० टक्के परतावा देऊ  शकेल.

*आजच्या परिस्थितीत या सदरात सुचविलेले शेअर्स खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.

(बीएसई कोड – ५००१०४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २१०

लार्ज कॅप

प्रमुख व्यवसाय :  रिफायनरी आणि तेल विपणन

बाजार भांडवल : रु. ३१,९३२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु. ३२९ / १५०

भागभांडवल भरणा : रु. १,५२३.८२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५१.११

परदेशी गुंतवणूकदार  १६.०७

बँक/ म्यु. फंड/ सरकार   २३.६१

इतर/ जनता ९.२१

पुस्तकी मूल्य :     रु. २०३.३१

दर्शनी मूल्य :      रु. १०/-

लाभांश :   ९७.५ %

प्रति समभाग उत्पन्न :  रु. २६.३४

पी/ई गुणोत्तर :     ६.४

समग्र पी/ई गुणोत्तर :      १७.११

डेट इक्विटी गुणोत्तर :      १.४२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :      ४.३५

रिटर्न ऑन कॅपिटल :       ५.६

बीटा :         ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.