कौस्तुभ जोशी

चलनवाढ म्हणजे वस्तूचे किंवा सेवेचे मूल्य आणि पशाचे मूल्य यांच्यात तफावत निर्माण होते. म्हणजेच व्यवहारात वस्तूंपेक्षा पशाचे प्रमाण वाढते. चलनात जितके जास्त पैसे असतात त्यापेक्षा जास्त वस्तू असल्या तर मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण होते आणि चलनवाढ अस्तित्वात येते.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

चलनवाढीचे दोन प्रमुख प्रकार पडतात त्यातील एक प्रकार म्हणजे मागणीतील वाढीमुळे झालेली चलनवाढ व दुसरा प्रकार पुरवठय़ातील गडबडीमुळे झालेली चलनवाढ. आपण मागणीतील वाढीमुळे झालेल्या चलनवाढीविषयी जाणून घेऊ.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ लॉर्ड केन्सने म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठय़ातील असंतुलन हे अशा प्रकारच्या चलनवाढीचे प्रमुख कारण असते. जसजशी अर्थव्यवस्थेत प्रगती होते, उत्पादन वाढतं, लोकांचं उत्पन्न वाढतं तसतशी लोकांची वस्तू खरेदी करण्याची क्षमतासुद्धा वाढते. अशा वेळी वस्तू खरेदी करताना अधिकाधिक मागणी नोंदवली गेली आणि तेवढा पुरवठा नसला तर चलनवाढ अनुभवास येते. अर्थव्यवस्थेत बेरोजगारीचा दर कमी झाला म्हणजेच अधिकाधिक लोकांकडे उत्पन्नाचे स्रोत तयार झाले तर वाढीव उत्पन्न अर्थव्यवस्थेत वाढीव मागणी तयार करते. तेवढी मागणी पूर्ण करण्याची क्षमता अल्पकाळात निर्माण करता येत नाही. त्यामुळे मागणीतील वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरते. चलनवाढीचे आणखी एक कारण म्हणजे सरकारी खर्चात झालेली वाढ. सरकार तिजोरीतून सढळहस्ते पसा सोडते तेव्हा अर्थव्यवस्थेत पशाचा प्रवाह निर्माण होतो. लोकांच्या हातात पसा पोहोचला की त्यांची खरेदीशक्ती वाढते व खरेदीचा उत्साह वाढतो. अशा वाढीव खरेदीचा सामना करण्यासाठी बाजारपेठ मात्र तयार नसते.

किती वस्तू निर्माण करायच्या याचे बाजाराचे गणित ठरलेले असते. वस्तूचे उत्पादन किती करायचे? अचानक मागणी वाढली तर थोडेसे जास्त उत्पादन करण्याची तयारी ठेवायची असे निर्णय उत्पादन करणारे घेऊ शकतात, मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या दरापेक्षा जोरदार मागणी वाढली तर चटकन उत्पादन वाढवता येत नाही व त्यामुळे मागणी आणि पुरवठय़ाचे गणित बिघडते आणि चलनवाढ निर्माण होते.

अर्थव्यवस्थेत सर्वच क्षेत्रांत जोमदारपणे प्रगती होत असेल आणि स्वाभाविकच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली असेल तर राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा थेट परिणाम लोकांच्या खरेदी शक्तीवर झालेला दिसून येतो.

चक्र तेच! अधिक उत्पन्न.. अधिक खरेदीची क्षमता.. अधिक मागणी.. अनुभवास येणारी भाववाढ.