23 February 2020

News Flash

अर्थ वल्लभ : काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास!

गेल्या दोन वर्षांमध्ये स्मॉल कॅप समभागांची मोठी घसरण झाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

वसंत माधव कुळकर्णी

आयटीआय स्मॉल कॅप फंड

स्मॉल कॅप समभागांवर अर्थव्यवस्थेचा व्यापक परिणाम होत असतो. सध्या अर्थव्यवस्था व्यापारचक्रीय मंदीच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. शिवाय दोन वर्षांतील तीव्र घसरणीमुळे स्मॉल कॅपचे नव्याने गुंतवणूक करण्यास एक आकर्षक मूल्यांकन उपलब्ध आहे. एकूणच पोर्टफोलिओ परतावा वाढविण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओचा लहानसा हिस्सा स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी राखून ठेवायला हवा.

गेल्या दोन वर्षांमध्ये स्मॉल कॅप समभागांची मोठी घसरण झाली आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप समभागांचे अधिक प्रमाण आहे, अशा पोर्टफोलिओची चाळण झाली आहे. ‘निफ्टी स्मॉल कॅप २५०’ निर्देशांकांने ३१ जानेवारीच्या बंद भावानुसार एक, तीन आणि पाच वर्षांत अनुक्रमे ७.०८, २.४७, आणि ४.६९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. लार्ज कॅप समभागांच्या कामगिरीच्या तुलनेत एखाद्याला स्मॉल कॅप फंडात गुंतवणुकीचा सल्ला देणे हे अपशब्द उच्चारण्यासारखे आहे. परंतु लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप मूल्यांकनाच्या तफावतीमुळे जोखीम-परतावा गुणोत्तर सध्या स्मॉल कॅप गुंतवणुकीकडे झुकलेले आहे. आयटीआय म्युच्युअल फंडाने या पाश्र्वभूमीवर ‘आयटीआय स्मॉल कॅप’ फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिल्याने या फंडाची दखल घेणे गरजेचे वाटते.

लार्ज कॅप, स्मॉल कॅप मूल्यांकनातील विस्तृत तफावत खूपच मोठी असून सध्याच्या मूल्यांकनात स्मॉल कॅप फंडात केलेली गुंतवणूक नजीकच्या काळात लक्षणीय कामगिरी करेल, अशी आशा वाटते. या आधी वर्ष २००३, २००९, आणि २०१३ मध्ये मूल्यांकनात अशीच विस्तृत तफावत होती. तफावतीमुळे साधारणत: या स्तरांवर केलेल्या गुंतवणुकीने पुढील १८ ते २४ महिन्यात अतिशय आकर्षक परतावा दिला होता. हा इतिहास असला तरी स्मॉल कॅप गुंतवणूक हा एक ‘हाय रिस्क हाय रिटर्न’ गुंतवणूक प्रकार आहे. स्मॉल कॅप समभागांची तेजी साधारणत: १८ ते २४ महिन्यांची असते. स्मॉल कॅप फंडाचे एनएव्ही २००९ मधील १८ महिन्यांच्या तेजीत दुपटीने तर २०१३ ते २०१७ दरम्यान अडीच ते तीन पटीने वाढले. बाजाराच्या तेजीच्या टप्प्या दरम्यान स्मॉल कॅप गुंतवणुकीतून कमावलेला परतावा लक्षणीय असतो. परंतु बाजाराच्या मंदीच्या टप्प्यांमधील संभाव्य नुकसानदेखील मोठे असते. म्हणूनच एखादा गुंतवणूकदार ज्या वेळेस स्मॉल कॅप समभागात गुंतवणूक करतो ती वेळ आणि मूल्यांकन खूप महत्त्वाचे ठरल्याचे गत काळात दिसून आले आहे. असे घडते, कारण स्मॉल कॅप समभागांवर अर्थव्यवस्थेचा व्यापक परिणाम होत असतो. सध्या अर्थव्यवस्था व्यापारचक्रीय मंदीच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. शिवाय दोन वर्षांतील तीव्र घसरणीमुळे स्मॉल कॅपचे नव्याने गुंतवणूक करण्यास एक आकर्षक मूल्यांकन उपलब्ध आहे. एकूणच पोर्टफोलिओ परतावा वाढविण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओचा लहानसा हिस्सा स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी राखून ठेवायला हवा. स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक एसडब्ल्यूपी पद्धतीने नव्हे तर एकरकमी गुंतवणूक करून एकरकमी काढून घेतल्यास चांगला नफा मिळू शकतो. हा फंड प्रकार अत्यंत अस्थिर असल्याने एसआयपी सुरू केल्यावर मोठा नफा दिसला तरी २ ते ३ वर्षांत गुंतवणूक तोटय़ात जाण्याची शक्यता असल्याने एकरकमी गुंतवणूक आणि एकरकमी गुंतवणूक काढून घेणे ही रणनीती फायदेशीर ठरू शकते. फंड घराण्याच्या मल्टी कॅप, ईएलएसएस व अन्य फंडांच्या समभाग गुंतवणुकीत स्मॉल कॅप समभाग निवडण्याचे निधी व्यवस्थापकांचे कौशल्य दिसून आले आहे. या कौशल्याच्या बळावर फंड घराणे स्मॉल कॅप धार्जिणा फंड घेऊ न सज्ज झाले असून फंड २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीस खुला आहे.

‘द इन्वेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड’ आणि ‘फ्युचर क्रेडिट कॅपिटल लिमिटेड’ यांनी संयुक्तपणे ‘आयटीआय म्युच्युअल फंड’ प्रवर्तित केला आहे. आयटीआय समूह एक नाविन्यपूर्ण, उदयोन्मुख परंतु अवास्तव जोखीम न घेणारा वित्तीय सेवा क्षेत्रातील समूह आहे. या समूहाला संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी समभाग संशोधन आणि समभाग खरेदी – विक्री मालमत्ता खरेदीसाठी वित्तीय पुरवठा, स्थावर मालमत्ता विकास, साहसी भांडवल पुरवठा या व्यवसायात रस असून म्युच्युअल फंड हे या समूहाचे नवीन अपत्य आहे.

या समूहात प्रत्येक व्यवसायप्रमुख म्हणून एक अनुभवी व्यावसायिक व्यवस्थापक असतो. तो व्यवसायासंबंधी निर्णय घेतो. ‘द इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड’ या प्रवर्तकांच्या १९० शाखांतून ३,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. जॉर्ज हेबर जोसेफ आणि प्रदीप गोखले यांच्यासारखे अनुभवी निधी व्यवस्थापक असल्याने या फंडाची या सदरात गुंतवणुकीसाठी दखल घेतली गेली आहे. गुंतवणूकदार आपल्या जोखीमांकानुसार या फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकतात.

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

shreeyachebaba@gmail.com

First Published on February 3, 2020 4:00 am

Web Title: article on iti small cap fund abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : बेनामी मालमत्ता दुसऱ्याच्या नावाने गुंतवणूक करताना..
2 बाजाराचा तंत्र कल : क्षणिक विश्रांती
3 कर बोध : कर बचत गुंतवणुकीचे पुरावे वेळेत सादर करा
Just Now!
X