07 April 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी..

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला सेन्सेक्सवर ४१,८०० आणि निफ्टीवर १२,३०० चा अडथळा असेल

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या आठवडय़ाच्या पूर्वार्धात निफ्टी पूर्णपणे तेजीच्या बहरात.. तू तेंव्हा तशी तर आठवडय़ाच्या उत्तरार्धात मंदीत.. तू तेंव्हा अशी. अशा ऊन-पावसाच्या खेळात निर्देशांक मात्र गेल्या लेखात नमूद केलेल्या आपल्या परिघातच फिरत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,२५७.७४

निफ्टी : १२,११३.५०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला सेन्सेक्सवर ४१,८०० आणि निफ्टीवर १२,३०० चा अडथळा असेल, तर आधार हा सेन्सेक्सवर ४०,८५० आणि निफ्टीवर १२,०५० असेल. गेल्या सप्ताहात या परिघातच निर्देशांकाचा चढ-उतार होत आहे. येणाऱ्या दिवसांत निर्देशांक-सेन्सेक्सवर ४०,८५० आणि निफ्टीवर १२,०५० चा आधार राखण्यात अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४०,३५० आणि निफ्टीवर ११,९०० असे असेल.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) अंबुजा सिमेंट लिमिटेड

* तिमाही निकाल – गुरुवार, २० फेब्रुवारी

*  शुक्रवार, १४ फेब्रु.चा भाव – २०५.६० रु.

* निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – २०८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २०८ रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य २२० रुपये. भविष्यात २०८ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २४० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २०८ ते २२० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : २०८ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १९५ रुपयांपर्यंत घसरण.

२) बजाज ऑटो लिमिटेड

*  तिमाही निकाल- शुक्रवार, २१ फेब्रुवारी

*  शुक्रवार, १४ फेब्रुचा भाव – ३,१४४.१० रु.

*  निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – ३,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,००० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ३,३०० रुपये. भविष्यात ३,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३,४५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३,००० ते ३,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : ३,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,८५० रुपयांपर्यंत घसरण.

३) बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड

* तिमाही निकाल- शुक्रवार, २१ फेब्रुवारी

*  शुक्रवार, १४ फेब्रुचा भाव – ९,६८१.१५ रु.

*  निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – ९,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९,५०० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ९,९५० रुपये. भविष्यात ९,५०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १०,४०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ९,५०० ते ९,९५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : ९,५०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ८,८०० रुपयांपर्यंत घसरण.

४) बजाज फायनान्स लिमिटेड

*  तिमाही निकाल – शुक्रवार, २१ फेब्रुवारी

*  शुक्रवार, १४ फेब्रुचा भाव – ४,७८३.२५ रु.

*  निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर – ४,६०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,६०० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ४,८५० रुपये. भविष्यात ४,६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५,०५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४,६०० ते ४,८५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : ४,६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४,३०० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:08 am

Web Title: article on market trends abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!
2 थेंबे थेंबे तळे साचे : P 2 P लेंडिंग आहे तरी काय
3 बंदा रुपया : यांत्रिकीत भारी कोल्हापुरी
Just Now!
X