आशीष ठाकूर

दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत धावपटूंनी आपलं पहिलं लक्ष्य साध्य केल्यानंतर अंमळ थोडी विश्रांती घ्यावी आणि ताजेतवाने होऊन पुन्हा अंतिम लक्ष्याकडे धावपटू जसा वाटचाल करतो, तसेच काहीसे निफ्टीच्या बाबतीत सध्या घडत आहे. अवघ्या चार महिन्यांत निफ्टी निर्देशांकांवर १,७०० अंशांची भरीव वाढ झाल्याने आता क्षणिक विश्रांती क्रमप्राप्त आहे. ही विश्रांती आपण गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकावर अनुभवली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ४१,९४५.३७

निफ्टी : १२,३५२.४०

आताच्या घडीला सेन्सेक्सवर ४१,००० आणि निफ्टीवर १२,१०० या स्तरापर्यंतची क्षणिक विश्रांती अभिप्रेत असून, या स्तरावर निर्देशांक ताजातवाना होईल आणि त्यांचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४२,५०० आणि निफ्टीवर १२,५०० दृष्टिपथात येईल.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) कोटक महिंद्र बँक

* तिमाही निकाल – सोमवार, २०जानेवारी

* शुक्रवार, १७ जानेवारीचा भाव- १,६९७.८० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – १,६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,६५० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य १,७३० रुपये. भविष्यात १,६५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,६५० ते १,७३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : १,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम १,६०० रुपये व त्यानंतर १,५५० रुपयांपर्यंत घसरण.

२) एचडीएफसी एएमसी लिमिटेड

* तिमाही निकाल – मंगळवार, २१ जानेवारी

* शुक्रवार १७ जानेवारीचा भाव – ३,२६३.४० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ३,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,००० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ३,३०० रुपये. भविष्यात ३,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३,००० ते ३,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ३,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम २,८०० रुपये व त्यानंतर २,६५० रुपयांपर्यंत घसरण.

३) अ‍ॅक्सिस बँक

* तिमाही निकाल – बुधवार, २२ जानेवारी

* शुक्रवार १७ जानेवारीचा भाव – ७३९.८० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ७३५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७३५ रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ७६० रुपये. भविष्यात ७३५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७९० रुपयांच्या लक्ष्याकडे

वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७३५ ते ७६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ७३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ७२० रुपये व त्यानंतर ६८० रुपयांपर्यंत घसरण.

४) आयसीआयसीआय बँक

* तिमाही निकाल – शनिवार, २५ जानेवारी

* शुक्रवार १७ जानेवारीचा भाव – ५३०.९० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ५२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५२० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ५४५ रुपये. भविष्यात ५२० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५७५ ते ६०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ५२० ते ५४५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ५२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ४७५ रुपये व त्यानंतर ४५० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com