News Flash

‘ये मेरा इंडिया’

उद्योग क्षेत्रातील आवर्तने समजतात असे सजग गुंतवणूकदार त्यांच्या परिचित ‘सेक्टोरल फंडा’तून उत्तम नफा कमावू शकतात.

टाटा म्युच्युअल फंडाने पाच नवीन व आधीपासून अस्तित्वात असलेल्या एक अशा सहा योजनांचा संच ‘ऑन अ पीस ऑफ इंडिया’ या नाममुद्रेने गुंतवणुकीसाठी ४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खुला केला आहे.

टाटा म्युच्युअल फंडाने पाच नवीन व आधीपासून अस्तित्वात असलेल्या एक अशा सहा योजनांचा संच ‘ऑन अ पीस ऑफ इंडिया’ या नाममुद्रेने गुंतवणुकीसाठी ४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खुला केला आहे. या सर्व योजना जमा झालेल्या निधीपकी किमान ८० % निधी एका विशिष्ट उद्योग क्षेत्रात गुंतविण्याचे उद्दिष्ट असलेल्या आहेत. मोदी सरकारकडून आíथक उदारीकरणाचा वेग वाढण्याची, डिजिटल इंडिया तसेच पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीने गती पकडणे अपेक्षित असल्याने काही विशिष्ट उद्योग क्षेत्रे या योजनांची लाभार्थी असतील. फंड घराण्याची तशी अपेक्षा आहे.
नवीन योजनांची युनिट्स दहा रुपये दर्शनी मूल्यास तर विद्यमान योजनेची युनिट्स त्या दिवशीच्या एनएव्हीस उपलब्ध होणार आहेत. या संचात एसआयपी करायचा पर्याय नवीन विक्री काळात उपलब्ध नसून जानेवारीपासून या फंडात एसआयपी सुरु करणे शक्य होईल.
एस अँड पी बीएसई २०० निर्देशांकात बँकिंग, पायाभूत सुविधा, औषध निर्माण व आरोग्य निगा, तेल व वायू सारख्या क्षेत्राचा समावेश असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘एक धनादेश, एक अर्ज व सहा उद्योग क्षेत्रे’ असा प्रचार फंड घराण्याकडून या शृंखलेबाबत होत आहे. सामान्यत: एका विशिष्ट उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणारे फंड हे नवख्या गुंतवणूकदाराने करावयाचे धाडस नसून गुंतवणुकीत परिपक्वता लाभल्यानंतर करावयाची गोष्ट आहे. एका विशिष्ट उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणारे ‘सेक्टोरल फंड’ हे नेहमीच धोकादायक समजले जातात. मात्र ज्यांना त्या उद्योग क्षेत्रातील आवर्तने समजतात असे सजग गुंतवणूकदार त्यांच्या परिचित ‘सेक्टोरल फंडा’तून उत्तम नफा कमावू शकतात. राष्ट्रीयीकृत बँकेतला कारकून देखील आपल्या शाखेतील वाढणाऱ्या किंवा संकोचाणाऱ्या संकलित होणाऱ्या ठेवी व कर्ज वितरणावरून बँकिग क्षेत्राचा ढोबळ अंदाज सहज व्यक्त करू शकतो. मागील काही महिन्यात नेस्लेच्या घसरणीने व डॉ. रेड्डी सारख्या दिग्गज कंपनीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारणे दाखवा नोटिशीने ग्राहकोपयोगी वस्तू, औषध व आरोग्य निगा या सारखी क्षेत्रे गुंतवणुकीसाठी सुरक्षित बेटे असल्याच्या समजुतीला छेद दिला आहे. वर उल्लेख केलेली सर्वच उद्योग क्षेत्रे कोणत्याही ‘डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडात’ कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनांत वस्तू व सेवा कर विधेयक मंजूर करून घेताना मोदी सरकारची होणारी दमछाक पाहता या सरकारकडून असलेल्या अपेक्षांवर किती विसंबून राहून गुंतवणूक करायची याचा निर्णय प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करणे योग्य आहे. सरकार पिटत असलेल्या डांगोऱ्यावर विसंबून गुंतवणूक करणे किती फलदायी ठरू शकते याचा अनुभव ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांत असणारे गुंतवणूकदार घेत आहेत. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम स्वीकारण्याची क्षमता असते. एखाद्याला धोपट मार्ग पसंत असतो, तर एखादा न मळलेल्या वाटेवर चालणे पसंत करतो. ज्यांना न मळलेल्या वाटेवर चालणे पसंत आहे अशा गुंतवणूकदारासाठी हा संच असून अन्य गुंतवणूकदारांनी धोपट मार्ग पसंत करावा असे सुचवावेसे वाटते.

टाटा म्युच्युअल फंडाच्या योजना

chat-3

 

chat-4

mutualfund.arthvruttant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:01 am

Web Title: article on tata mutual fund
Next Stories
1 एका ‘जिप्सी’चे नियोजन
2 घरासाठी गुंतवणूक आताच नको, थोडे सबुरीने घ्या!
3 कर वाचवा आणि संपत्तीही वाढवा!
Just Now!
X