News Flash

गुंतवणूक दीर्घकालीन असली, तरच फायदा दिसेल..!

शेअर बाजारात मात्र अजून हवा तसा उत्साह दिसत नाही.

नवीन वर्षांचे पहिले तीन महिने संपले तसेच अर्थसंकल्प जाहीर होऊनदेखील एक महिना झाला. शेअर बाजारात मात्र अजून हवा तसा उत्साह दिसत नाही. नाही म्हणायला गुंतवणूकदारांना अजूनही एक छोटीशी आशा आहे ती रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणाची; परंतु तेरडय़ाचा रंग तीन दिवस या म्हणीप्रमाणे त्याचाही परिणाम शेअर बाजारावर किती काळ राहील ते बघायला हवे.

पोर्टफोलियोचा आढावा- पहिली तिमाही २०१६
‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत यंदाच्या पहिल्या तिमाहीत सुचविलेले शेअर्स आणि त्यांची कामगिरी कोष्टकात दिली आहे. ही कामगिरी फारशी चांगली दिसत नसली तरीही निराशाजनकही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी. सुचविलेले बहुतांशी शेअर्स हे मध्यम व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने आताच नफा/ तोटा तपासणे योग्य ठरणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच शेअर बाजारातील गुंतवणुकीने २०१५-१६ या आíथक वर्षांसाठी -९.३५% असा उणे परतावा दिला आहे.

अर्थसंकल्पात सूतोवाच केल्याप्रमाणे येत्या आíथक वर्षांपासून दर तिमाहीस सरकार अल्पबचत योजनांचे व्याजदर जाहीर करणार आहे. पीपीएफ, पोस्टाच्या विविध योजना यांचे व्याजदर अपेक्षेप्रमाणे कमी झाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरदेखील कायम ८.५% करमुक्त व्याज मिळेल याची आता शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला सुरक्षित पर्याय शोधणे हे कठीण होऊन बसले आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना बरी वाटत असली तरीही त्यात द्रवणीयता अजिबात नसल्याने ती आकर्षक ठरत नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार हाच उत्तम पर्याय आहे. २०१६-१७ हे आíथक वर्ष कसे असेल याची भाकीते सुरू झालेली आहेत. आता पर्यंतचा इतिहास पाहता शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे संधी मिळताच प्रत्येक मंदीला शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. वानगीदाखल, काही वर्षांपूर्वी सुचविलेल्या या शेअर्सनी पोर्टफोलिओच्या गुंतवणूकदार वाचकांना किती फायदा करून दिला आहे ते दुसऱ्या तक्त्यातून पाहता येईल.

‘पोर्टफोलियो’च्या वाचक, गुंतवणूकदारांना नवीन आíथक वर्षांच्या शुभेच्छा!

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

सूचना: लेखकाची वा त्याच्या आप्तेष्टांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

stocksandwealth@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 2:00 am

Web Title: article related long term investment
टॅग : Investment
Next Stories
1 बचत-गुंतवणूक गल्लती!
2 तिने खूप शिकावे म्हणून..
3 आरोग्यावरील वाढीव तरतुदीची लाभार्थी
Just Now!
X